Dindori

योग्य उपक्रमशील कामे करणारी जानोरी ग्रामपंचायत व सुसूत्रता असलेले लोकप्रतनिधींनी आदर्शवत. ना भुजबळ

योग्य उपक्रमशील कामे करणारी जानोरी ग्रामपंचायत व सुसूत्रता असलेले लोकप्रतनिधींनी आदर्शवत. ना भुजबळ

दिंडोरी प्रतिनिधी सुनिल घुमरे:-

जानोरी ग्रामपंचायत ही उपक्रमशील ग्रामपंचायत असून नवनवीन उपक्रम राबवून गावाचा विकास साधणारी ग्रामपंचायत म्हणून उल्लेख करावा लागेल असे गौरवोद्गार काढत जानोरी ग्रामपंचायतीने राबविलेल्या योजना व विकासकामांचा उल्लेख करत ग्रामपंचायतीच्या सर्व कार्यकारिणी मंडळाचे अभिनंदन महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांनी जानोरी येथे केले.
जानोरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल व क्रांतिसूर्य महात्मा फुले व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जानोरी येथे पार पडला. यावेळी नामदार भुजबळ बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की गावचा विकास करायचा असेल तर राजकारण न करता गाव विकासासाठी एकत्र आले पाहिजे. मी स्वतः जनतेचा प्रश्न सोडवताना अथवा विकासकामे करतांना जात किंवा पक्ष कधीही बघितलं नाही. आजही ते तत्व कायम चालू आहे.तसेच सध्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे पालकमंत्री म्हणून मी स्वतः चिंतेत असल्याचे त्यांनी नमूद केले.एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पाणीटंचाई जाणवत असल्याने जनतेला नियम पाळावे लागणार आहे. कोरोना नियमांच्या पालनाबरोबरच पाणीदेखील काटकसरीने वापरण्याचे आवाहन यावेळी भुजबळ साहेबांनी केले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घ्यावे लागत असले तरी ते जनतेच्या हितासाठी घेतले जात असून एक जबाबदारी म्हणून नियम करावे लागतात. आपणही त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन भुजबळांनी केले. सध्या ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी लढा चालू असून त्यात नक्कीच यश मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असेही प्रतिपादन करण्यात आले.यावेळी व्यापारी संकुलांचे लोकार्पण नामदार छगन भुजबळ व नामदार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी स्थानिक प्रश्न विमानतळाला जानोरी नाशिक विमानतळ असे नाव द्यावे विमानतळात स्थानिकांना नोकऱ्या व टुरिस्ट वाहन धारक म्हणून परवानगी मिळावी जानोरी ही सिंहस्थ कुंभमेळा कर्मभूमी आहे त्यासाठी आगामी काळात भरीव निधीची तरतूद व्हावी व इतर राष्ट्रीयकृत बँका प्रमाणे बँक ऑफ बडोदा कर्जदारांना कर्ज सवलत मिळावी असे गावकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आलीकार्यक्रमाला कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, जि.प. सदस्य भास्कर भगरे, माजी जि.प.सदस्य शंकरराव काठे, प्रविणनाना जाधव, सुनिल घुमरे कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी, पं.स.सभापती कामिनी चारोस्कर, डॉ योगेश गोसावी, शाम हिरे, तौफिक मनियार, राजु शिंदे, सुरेश खोडे, किशोर विधाते शरद का ठे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी परिसरातील पाणी, विज, रस्ता तसेच कर्जवसुलीसंबंधी समस्या सांगितल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली.विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनीही परिसरातील समस्यांवर नजर देत यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच रेशनकार्ड तसेच खावठी योजनेसंदर्भात येणाऱ्या अडचणींविषयी नामदार भुजबळांच्या निदर्शनास आणून देवून त्यावर तोडगा काढण्यासाठी विनंती केली. यावेळी प्रांताधिकारी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गटविस्तार अधिकारी जिभाऊ शेवाळे , पोलिस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व सचिन नवले,मंडळ अधिकारी राजेंद्र विधाते, ,तलाठी किरण भोये, ग्रामविकास अधिकारी के.के.पवार यांसह सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके,ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, विष्णुपंत काठे, दत्तात्रय घुमरे, अशोक केंग,नामदेव डंबाळे,सुभाष नेहरे, दत्तात्रय केंग, ललीता वाघ, कमल विधाते, हिराबाई भोई, सत्यभामा वाघ, मंदा शिंदे, सुनिता बेंडकुळे, शैला गवारी यांसह मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील आशा कार्यकर्त्या , महात्मा फुले विद्यालय मुख्याध्यापक व शिक्षवृंद, विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, जानोरी, मोहाडी, आंबे दिंडोरी,खडकसुकेणे, जऊळके-दिंडोरीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचलन व आभार जि.प.शिक्षक धनंजय वानले यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button