Pune

प्राध्यापक सुनील गवारी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

प्राध्यापक सुनील गवारी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

दिलीप आंबवणे पुणे

पुणे : सांगली येथील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यांना 5 ऑक्टोंबर जागतिक शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
प्राध्यापक सुनील गवारी यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सपत्नीक सौ कुसुम सुनील गवारी यांच्या समवेत हा पुरस्कार देण्यात आला. प्रा. गवारी हे आदिवासी भागातून उच्च शिक्षण घेऊन आज सांगली या जिल्हात चांगल्या प्रकारे समाजकार्य करत आहेत. त्याच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार, निवृत्त कर्मचारी सत्कार, आदिवासी समाज एकजूटीसाठी आदिवासी दिनदर्शका, प्रबोधन मेळावे असे अनेक उपक्रम घेत असतात. नोकरी करत करत समाजाचे देणे लागतो या उदात हेतू डोळासमोर ठेवून काम करणारे हसरे स्वभावाचे, मनमिळावू प्रा. सुनिल गवारी हे आदिवासी समाजासाठी काम करत आहेत.
या पुरस्काराचे वितरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पूना टेशन पुणे येथे करण्यात आले.
त्यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, ज्येष्ठ विचारवंत श्रावण देवरे, ज्येष्ठ साहित्यिक सुनील सोनवणे, प्रदेश सचिव सत्यजित जानराव, प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला.
या पुरस्काराबद्दल बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, बिकेडी सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी, उपाध्यक्ष गुलाब भोईर, भरत सांळुखे, तसेच सह्याद्री आदिवासी कर्मचारी असो. सांगली माजी जिल्हा उपाध्यक्ष जिजाराम मोरे, दिलीप सुपे, उल्हास भांगे, कोळप, एकनाथ दाते, विकास जंगले, शिवाजी भोईर, यांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button