Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र भरून काढा कॅल्शियम ची झिज

आरोग्याचा मुलमंत्र

भरून काढा कॅल्शियम ची झिज

कॅल्शियम हा दात आणि हाडांमधील अत्यंत मूलभूत घटक आहे. त्यामुळे पेशींच्या कार्यासोबत, हाडांचे प्रसरण व आकुंचन पावणेही अवलंबून असते. पेशीचे विभाजन, प्रवाही रक्त, रक्तातील अन्य घटकांचे प्रभावी कार्यक्षमतेसाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. ही कॅल्शियमची मात्रा नेमकी किती प्रमाणात असावी, याचे व्यक्तीनुसार वैद्यकीय ठोकताळे निराळे असतात. त्याची तूट हाडांची दुखणी निर्माण करते तर त्याचा अतिरिक्त पुरवठ्यामुळे हाडे तुटण्वयाची शक्यता असते.
मात्र, हे कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढविता येते. त्यासाठी औषधाची गरज नाही.

दूध –
दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते.

दही –
दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन करून कॅल्शियम मिळते.

मसाले-
तुळस -ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसुण तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट देतात, यातून कॅल्शिअम मिळते.

पालेभाज्या –
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, मशरूम सलाड

शेंगभाज्या –
शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते

संत्री-लिंबू –
संत्री, लिंबू यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

सोयाबीन –
सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे.

गूळ – गुळामध्ये भरपूर प्रमाणत कॅल्शियमचे असते. परंतु कॅल्शियमच्या पूर्तीसाठी गुळाचे जास्त सेवन करणे ठीक नाही. गुळामध्ये कॅल्शियमसोबतच फोस्फोरससुद्धा असते. जे शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतो.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
{_होमिओपॅथी तज्ञ_}

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button