Amalner

?️ अमळनेर कट्टा… अक्कलपाडा धरणांतून पांझरा नदीत आवर्तन सोडा आमदार अनिल पाटलांची धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, मुडी फडबंधारा दुरुस्तीसाठी निधीची मागणी

?️ अमळनेर कट्टा… अक्कलपाडा धरणांतून पांझरा नदीत आवर्तन सोडा आमदार अनिल पाटलांची धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, मुडी फडबंधारा दुरुस्तीसाठी निधीची मागणी

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पांझरा काठच्या गावांना पाणीटंचाईचे सावट निर्माण झाल्याने अक्कलपाडा धरणातुन पांझरा नदीत आवर्तन सोडण्यात यावे यासाठी आमदार अनिल पाटील यांनी धुळे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.
यावेळी आमदारांनी मुडी फडबंधारा दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती मधुन 20 लक्ष निधीस मंजुरी देण्यात यावी अशी देखील केली,यास अप्पर जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.दरम्यान पांझरा नदीत आवर्तन लवकरात लवकर सोडल्यास अमळनेर तालुक्यातील पांझरा काठावरील 16 गावांसह, धुळे व शिंदखेडा तालुक्यातील पांझरा नदीकाठांवरील गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटनार असल्याची बाब आमदारांनी जिल्हाधिकारी यांना लक्षात आणुन दिली,आणि सद्यस्थितीत या गावांना पाण्याच्या किती अडचणी आहेत ते देखील लक्षात आणून दिले,यावेळी आमदारांसोबत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव उदय पाटील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button