शिरुड येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा रजनीकांत पाटील अमळनेर अमळनेर : अमळनेर तालुक्यातील शिरुड येथे प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय शिरुड येथे प्रशासक अधिकारी श्री अमोल भदाणे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले
विविध कार्यकारी सोसायटी शिरुड येथे सदस्य श्री पुंडिलक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहा कार्यकम झाला तसेच
श्री दत्त सार्वजनिक वाचनालय शिरुड येथे देशसेवेसाठी कार्यरत असलेले जवान श्री अमोल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरुड येथे शालेय शिक्षण समिती सदस्या सौ दिपश्री बापूराव महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .व
व्ही .झेड पाटील हायस्कूल शिरूड येथे शालेय समिती सदस्य श्री विजय पंडित बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला
ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सर्व संस्थाचे अध्यक्ष व पदाधिकारी , आजी माजी सरपंच, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, तलाठी , मुख्याध्यापक,शिक्षक -शिक्षिका, अंगणवाडीताई, मदतनीस ताई,आरोग्य सेविका ,गावातील नागरीक प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते