Amalner

?️ अमळनेर कट्टा… कोरोनाच्या संकटातून सुटके साठी दवा के साथ दुवा भी जरूरी- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष नविद शेख,

?️ अमळनेर कट्टा… कोरोनाच्या संकटातून सुटके साठी दवा के साथ दुवा भी जरूरी- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष नविद शेख,

अमळनेर : धार येथिल हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत अब्दुल रज्जाक बाबा दर्ग्यावर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे तालुका अध्यक्ष नविद शेख यांनी चादर चढवून कोरोनाच्या भयंकर रोगापासून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून चादर चढवली.
अमळनेर शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता हैदोस व मृत्यूच्या तांडव मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील दवाखाने कोरोना रुगणांनी तुडुंब भरलेले आहे. स्मशानभूमीत प्रेतांना अग्निदहन करण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. अशी भयावह स्थिती निर्माण झाल्याने नागरिकां मध्ये भितीचे वातावरण पसरले असतांना दवा बरोबर दुवा ची गरज असल्याने तालुक्यातील धार येथिल हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत अब्दुल रज्जाक बाबा दर्ग्यावर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे तालुका अध्यक्ष नविद शेख यांनी चादर चढवून कोरोना या महामारी पासून भारतीयांना मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी अखतर अली सैय्यद,नईम पठान,साबिर बागवान आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

?️ अमळनेर कट्टा... कोरोनाच्या संकटातून सुटके साठी दवा के साथ दुवा भी जरूरी- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष नविद शेख,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button