Maharashtra

संदीप पाटील यांचा भावुक करणारा फोटो सोशल मीडिया वर व्हायरल

संदीप पाटील यांचा भावुक करणारा फोटो सोशल मीडिया वर व्हायरल

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : कोरोना विषाणू च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र पुणे जिल्ह्यात लक्ष ठेवून असलेले एक कर्तव्यदक्ष अधीकारी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांचा भावूक करणारा कुटुंबासमवेत चा फोटो व्हायरल झाला आहे . स्वागतकक्ष पुणे जिल्ह्यातील सर्व पोलिस बांधवांचे कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.असे असताना स्वतः च्या कुटुंबाला सध्या अशा प्रकारे भेटत असून सोशल डिस्टंन्सिंग चा नियम ते स्वतः पाळत आहे.कर्तव्य पार पाडत असताना यापेक्षा वेगळा त्याग देणारा संदेश कोणताच नसेल.
हा फोटो पाहिल्यानंतर तरी नागरिकांनी पोलिस बांधवांना सहकार्य करावे असे समाजसेवी संस्था व समाजसेवक आव्हान करीत आहेत . तरी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडु नये सहकार्य करावे असे आवाहन आमच्याही माध्यमातून ही करण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button