Jalana

४६ लाखांची फसवणूक; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

४६ लाखांची फसवणूक; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालना : जालना येथील एका सोलार कंपनी चालकाकडून सोलार पॅनलच्या साहित्याची आर्डर घेतल्यानंतर ४६ लाख रुपये घेऊन ठरल्याप्रमाणे साहित्य पुरवठा न करणाऱ्या भावनगर (गुजरात) येथील तीन कंपनी मालकाविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात राहणाऱ्या वसुधा भारत भुतेकर (४२) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. आपली न्यू बालाजी इंटरप्रायजेस नावाची कंपनी असून, कंपनीचा सर्व व्यवहार पती भारत भुतेकर पाहता. त्यांनी पॉवर सप्लाय ग्रीन एनर्जी प्रा. लि. या कंपनीस ७८७ सोलार पॅनलची ऑर्डर देऊन कंपनीच्या खात्यावर ठरल्याप्रमाणे ४ ते १० मे दरम्यान आरटीजीएसद्वारे ४६ लाख रुपये पाठवले होते.
मात्र, संशयित पियूष दिलीपभाई सोलंकी, रुतू आनंदकुमार ओझा, प्रतिक नाई (सर्व. रा. भावनगर, गुजरात) यांनी इवे बिल व इतर बिल भारत भुतेकर यांच्या मोबाईलवर पाठवून दोन दिवसात ऑर्डर मिळेल असे सांगितले. मात्र, सदर आर्डर आजपर्यंत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भुतेकर यांनी तालुका ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. सहायक निरीक्षक रवींद्र अंभोरे अधिक तपास करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button