Amalner

टोकरे कोळीं ना एस टी चे प्रमाणपत्र देणाऱ्या सेतू चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल..आदिवासी एकता संघर्ष समितीच्या मागणीला यश…

टोकरे कोळीं ना एस टी चे प्रमाणपत्र देणाऱ्या सेतू चालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल..आदिवासी एकता संघर्ष समितीच्या मागणीला यश…

अमळनेर येथील बनावटअनुसूचित जमाती चे दाखले देणाऱ्या सेतू चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकान बंद करण्यात आले आहे. याबतीत सविस्तर माहिती अशी की प्रांत अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या दाखल्यावर बदल करून टोकरे कोळीना अनुसूचित जमाती चे प्रमाणपत्र देऊन बनावट दाखले देण्याचा सेतू चालकाचा संताप जनक प्रकार उघडकीस उघड झाला आहे.sbc चे प्रमाणपत्र प्रांत यांच्या सहीचे घेतल्या नन्तर त्या बारकोड चा उपयोग करून एस टी प्रवर्गाचे जातीचे प्रमाणपत्र २० हजार बदलण्याचा प्रकार आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा जयश्री दाभाडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भात उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांची भेट घेतली व सदर प्रकार लक्षात आणून दिला.तसेच याबतीत निवेदन देखील देण्यात आले . यावर कार्यवाही करत उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी संबंधित सेतू चालकावर गुन्हा दाखल करण्याचे तात्काळ आदेश दिले.या अनुषंगाने काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोळी समाजाचे एसबीसी प्रवर्गाचे दाखले मंजूर करून त्यांना एस टी प्रवर्गात टोकरे कोळी दाखवून शासनाची व ग्राहकांची फसवणूक
केल्याचा कारनामा रफिक जब्बार शहा (रा नांद्री) या सेतू चालकाने केला.राहुल प्रकाश सैंदाने , सुनील प्रकाश सैंदाने , शामलाल ज्ञानेश्वर सैंदाने यांचे टोकरे कोळी समाजाचे दाखले बनवण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी गेले होते. त्यावेळी रफिक शहा याने त्यांच्याकडून प्रत्येकी २० हजार प्रमाणे ६० हजार रुपये घेतले. संबंधितांचे एसबीसी म्हणजे विशेष मागासवर्ग जातीचा दाखला प्रस्ताव उपविभागीय कार्यालयात पाठवून ऑनलाइन कागदपत्रे तपासून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी डिजिटल सही देऊन एसबीसी दाखले दिले. मात्र रफिक याने एसबीसी
दाखले देण्याऐवजी तिघा ग्राहकांना अनुसूचित जमातीच्या म्हणजे एस टी प्रवर्गातील टोकरे कोळी जातीचे दाखले बारकोड चा उपयोग करून बनविले.ऑनलाइन कागदपत्रे तपासून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी डिजिटल सही देऊन एसबीसी दाखले दिले. मात्र रफिक याने एसबीसी
दाखले देण्याऐवजी तिघा ग्राहकांना अनुसूचित जमातीच्या म्हणजे एस टी प्रवर्गातील टोकरे कोळी जातीचे दाखले बनवून दिले. मूळ दाखल्यात हेराफेरी
करून लाभासाठी जातीचा प्रवर्ग बदलवून टाकल्याचे उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी सखोल तपासणी केली असता बनावट
दाखल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र चौधरी याना प्राधिकृत करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button