Erandol

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन तरुण शेतक-याची आत्महत्या ?

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन तरुण शेतक-याची आत्महत्या ?

विक्की खोकरे

प्रतिनिधी – एरंडोल येथील गांधीपुरा भागातील यशोदीप चौकातील समाधान कर्तारसिंग पाटील (वय ३५) या युवा शेतक-याने रविवारी सकाळी ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले.
बुधवारी सायंकाळी जळगाव सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.हि घटना नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला संध्याकाळ पर्यंत नोंद करण्यात आलेली नव्हती.

मृत समाधान पाटील यांच्याकडे कडे तिन एकर कोरड वाहू शेती असुन त्यांच्याकडे सोसायटी,बचतगट व खाजगी सावकारीचे ७ ते ८ लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले.खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे त्यांनी आपल्या शेतात लावलेल्या ज्वारी पिकाचा तोंडाशी आलेला घास वाया गेला.त्यामुळे कर्ज कसे फेडायचे ? या चिंतेने त्रस्त होऊन त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली.

विशेष हे की त्यांची पत्नी इतर कुटुंबियांसह नंदुरबार येथे नातेवाईकाच्या गांधामुक्तीच्या कार्यक्रमाला गेले असता समाधान यांनी आत्महत्या केली.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,आई,लहान भाऊ असा परिवार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button