Delhi

महत्त्वाचे…अखेर “गोळी” ला मान्यता..! काय आहे मोलनूपिरावीर..?

अखेर “गोळी” ला मान्यता..! काय आहे मोलनूपिरावीर..?

दिल्ली कोरोनाची जगभरात थैमान घातले आहे. आतापर्यंत या महामारीत जगभरातील ५० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही कोरोनाचा कहर संपुष्टात आलेला नाही. आतापर्यंत तरी कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये फक्त लसीच उपलब्ध होत्या. शंभर टक्के परिणामकारक ठरेल, असं कोणतंही औषध कोरोनावर उपलब्ध नव्हतं. मात्र, आता कोरोनावरील एका औषधाला भारतामध्ये मंजूरी मिळाली आहे. मोलनुपिरावीर असं या औषधाचं नाव आहे. अँटी-व्हायरल औषध मोलनुपिरावीर (Anti-viral drug Molnupiravir) आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाऊ शकतात, अशी माहिती आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज मंगळवारी ट्विटरद्वारे दिली आहे.
Merck & Co कंपनीचा असा दावा आहे की, हे औषध कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये प्रभावी ठरु शकतं. मर्क या अमेरिकन कंपनीने या औषधाच्या निर्मितीसाठी अमेरिकेच्या Ridgeback Biotherapeutics कंपनीसोबत करार केला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही गोळी प्रभावी असून तिच्यामुळे रुग्णाला दवाखान्यात भरती करण्यापासून अथवा त्याच्या मृत्यूची संभावना कमी होते.ट्रायलमध्ये ७७५ लोकांचा समावेशकंपनीने म्हटलंय की, ट्रायलमध्ये ७७५ लोकांचा समावेश करण्यात आला होता. प्राथमिक आकडेवारीनुसार, ज्या रुग्णांनी कोरोनाचे संक्रमण झाल्याच्या पाच दिवसांच्या आत हे औषध घेतलं आहे त्यांच्यावर दवाखान्यात भरती व्हायची अथवा मृत्यू व्हायचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. सुरुवातीला या औषधानं क्लिनिकल ट्रायलमध्ये हायरिस्क रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आणि मृत्यूची शक्यता ३० टक्क्यानं कमी असल्याचं दिसून आलं होतं.MHRAच्या माहितीनुसार, या अँटीव्हायरल औषधाला मोलनुपिरावीर म्हणतात. विषाणूची प्रतिकृती बनवण्याची क्षमता कमी करण्याच कार्य हे औषध करते, ज्यामुळे आजाराच्या प्रसाराचा वेग कमी होतो. आमच्या चाचण्यांमध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, “हे औषध गंभीर आजार होण्याचा धोका असलेल्या सौम्य ते मध्यम कोविडबाधित लोकांना रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे”दरम्यान, क्लिनिकल ट्रायलमधील डेटाच्या आधारे, संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे औषध घेतल्यास जास्त प्रभावी ठरते. तसेच MHRA नं शिफारस केलीए की कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यापासून हे औषध पाच दिवसांच्या आत वापरावं. लठ्ठपणा, म्हातारपण, मधुमेह आणि हृदयरोग यासह गंभीर आजार असलेल्या लोकांना वापरण्यासाठी या औषधाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button