Amalner

अमळनेर तालुक्यातील मारवड येथे आदर्श विवाह सोहळा संपन्न…

अमळनेर तालुक्यातील मारवड येथे आदर्श विवाह सोहळा संपन्न…

अमळनेर (प्रतिनिधी) :-रजनीकांत पाटील

कोरोना या विषाणुच्या महामारीने देशासह राज्यात सर्वत्र थैमान घातल्यामुळे विवाह सोहळ्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी समारंभास बंदी असल्याने या परिस्थितीवर साळुंखे परिवाराने मात करत मोजके नातेवाईक व पाहुणे मंडळींच्या साक्षीने सुरक्षीत अंतर ठेवत एक आदर्श विवाह पार पाडला.
मारवड येथील कै. बी. आर. पाटील सायन्स कॉलेजचे अध्यक्ष भिकनराव भालेराव पाटील यांचे चिरंजीव हर्षल व चहार्डी ता. चोपडा येथील राजेंद्र सोनवणे यांची कन्या चि. सौ. का. जयश्री यांचा विवाह मे महिन्यात ठरलेला होता. मात्र कोरोना या आजाराने देशासह राज्यात थैमान घातल्याने शासनाने सर्वत्र संचारबंदी, व सुरक्षीत अंतर ठेवण्याच्या अटी घालून दिल्याने सार्वजनिक कार्यक्रम समारंभ घेण्यास बंदी असल्यामुळे वर व वधु पक्षाच्या कुटुंबातील जेष्ठ मंडळी यांनी एकमेकांशी चर्चा करून लग्न समारंभातील होणारा वारेमाप खर्च टाळून कोणताच वाजागाजा न करता येथील राहत्या घरी येथे दि. २९ जून रोजी दोन्ही परिवारातील मोजके नातेवाईकांच्या साक्षीने सुरक्षीत अंतर ठेवत तोंडाला मास्क लावुन शासनाने घातलेले नियमाचे व अटी चे पालन करून हा विवाह समारंभ पार पाडला.

या प्रसंगी जि. प. सदस्या जयश्री अनिल पाटील, मारवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, पत्रकार डॉ. विलास पाटील, सरपंच उमेश साळुंखे या सह मान्यवरांनी उपस्थित राहून वधू वर यांना आशीर्वाद दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button