Erandol

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम,अंतर्गत लाळखुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी रोगप्रतीबंधक लसीकरणाचा एरंडोल येथे शुभारंभ

राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम,अंतर्गत लाळखुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी रोगप्रतीबंधक लसीकरणाचा एरंडोल येथे शुभारंभ

विक्की खोकरे

एरंडोल येथे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम,अंतर्गत लाळखुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी रोगप्रतीबंधक लसीकरणाचा शुभारंभ आज दि.१४ ऑक्टोंबर २०२० रोजी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सदर कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जनावरास १२अंकी टँग (बिल्ला) क्रमांक देण्यात येवुन त्याची नोंदणी ‘इनाफ,प्रणालीअंतर्गत ऑनलाइन पध्दतीने करण्यात येत असुन त्या जनावरांचे लाळखुरकत रोग प्रतीबंधक लसीकरण करण्यात येत आहे.
एरंडोल तालुक्यात एकूण ६६गावे असुन त्यात गायवर्गीय २२५५४ तर म्हैसवर्गीय १२७९४ असे एकूण ३५३४८ पशुधनाचे लसीकरण व टँगींग दि. ३१ऑक्टोंबर २०२० पर्यंत करण्याचे नियोजन आहे.

त्यासाठी १८ शासकीय अधिकारी व कर्मचारी तर १४ खाजगी सेवादाते यांची नियुक्ती करण्यात आली असुन सदर जनावरांचे टँगींग केल्यामुळे त्यांना आधार क्रमांक असल्याप्रमाणे ओळख मिळणार असुन त्यांची खरेदी-विक्री व लसीकरण उपचार सुलभ होणार आहे, तसेच शेतकर्यांची जनावरे चोरी गेल्यास त्यांचा तात्काळ शोध घेण्यास मदत होणार आहे.
तरी प्रत्येक पशुपालकाने आपल्या मालकीच्या जनावरांना त्वरीत टँगींग व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पशुधन विकास अधिकारी,पं.समीती एरंडोल चे डॉ.ए.एस.महाजन यांनी याप्रसंगी पशुपालकांना केले.
या लसीकरण कार्यक्रमास डॉ.ए.एस. महाजन(पशुधन विस्तार अधिकारी,पं.स.एरंडोल),डॉ. जाधव(प.वि.अधिकारी,तांञिक,जळगाव),डॉ.पी आर. पाटील(सहा.प.वि.अ कासोदा),डॉ. सुभाष सोनवणे(उञाण),डॉ.हेमंत नागणे(पशुधन पर्यवेक्षक),डॉ. राहूल साळुंखे उपस्थित होते.
प्रतीथयश पशुपालक सुरज काबरा यांचे सदर कार्यक्रमास सहकार्य केलयाबद्दल डॉ.ए.एस.महाजन यांनी याप्रसंगी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी वासुदेव वंजारी,संजय पाटील,संजय चौधरी,रघुनाथ पाटील,शैलेश चौधरी आदींनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button