Faijpur

स्त्रीभ्रूणहत्या मानवतेसाठी कलंक – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

स्त्रीभ्रूणहत्या मानवतेसाठी कलंक – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : नवरात्र दुर्गोत्सवात नारी शक्तीचा उदोउदो होत असताना समाजात महिला वर्गांना मिळणारी दुय्यम वागणूक व आधुनिकतेच्या नावाखाली अजूनही स्त्रीभ्रूणहत्या सारखं पातक होणे अत्यंत लज्जास्पद असून संपूर्ण मानव जातीसाठी कलंक आहे असे मत लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी व्यक्त केले.

ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना एकक व 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमात बोलत होते. धनाजी नाना महाविद्यालया चे प्राचार्य डॉ पी आर चौधरी व 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धिमन आणि प्रशासकीय अधिकारी कर्नल प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यात महिलावर्गाला सन्मानाने वागणूक देण्याची आणि स्त्री भ्रूण हत्या संबंधी व्यापक जनजागृति करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरीष दादा चौधरी, आमदार रावेर व यावल मतदार संघ, सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, 18 महाराष्ट्र बटालियन चे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन, प्रशासकीय अधिकारी कर्नल प्रवीण कुमार , सुभेदार मेजर कोमलसिंग महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अजय चौधरी, अशराज गाढ़े अश्फाक शेख यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button