Amalner

महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या एकावर 353 चा गुन्हा दाखल…

महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणाऱ्या एकावर गुन्हा दाखल…

अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथे महावितरण चे कर्मचारी वीज बिल वसुलीचे काम करत असताना अडथळा आणणाऱ्या एकावर मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सहायक अभियंता विजय गुर्जर हे त्यांचे कर्मचारी आनंद पाटील, मानसिंग पाटील, प्रशांत रणदिवे, रमेश ठाकरे यांच्या सोबत वावडे येथे वीजबिल वसुलीचे काम करीत असताना आरोपी रमेश देविदास मालचे रा. भरवस याने त्यांना अटकाव करत फिर्यादीची गाडीची चावी काढून धमकावले. त्यावरून मारवड पोलिसात भादवि कलम ३५३, ३४१, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनी राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. प्रकाश साळुंखे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button