Aurangabad

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : आज ९ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर मुस्लीम आरक्षणासाठी उपोषण करण्यात आले. उपोषण कर्ते अजहर अनवर सय्यद यांनी उपोषण केले. या उपोषणात विविध महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहे.

मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा. मॉबलिंचिंग केलेल्या, न्याय देण्यात यावा, मॉब लिंचिंग विरुद्ध कायदा तयार करावा. प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात यावे. बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लिम मुला-मुलींना यूपीएससी,एमपीएससीसाठी संस्था स्थापन करण्यात यावी. मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी. राज्यातील वक्फ जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावेत. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच बळकटीकरण करण्यात यावं.वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.

या बाबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. व लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून लवकरच प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. तसेच जो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत मी लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचे उपोषण कर्ते अजहर सय्यद यांनी सांगितले.

संबंधित लेख

Back to top button