Aurangabad

पर्यावरण संरक्षण जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा : जिल्हाधिकारी

पर्यावरण संरक्षण जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा : जिल्हाधिकारी

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : वसुंधरेच्या रक्षणासाठी वृक्षलागवड आणि त्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान यामध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षण हा जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा, असे सांगितले आहे. यासाठी नागरिकांनी आवश्यकता असल्यासच इंधन वाहनाचा वापर करावा. विजेची, पाण्याची बचत करावी, अशा सुक्ष्म परंतु महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. या बाबींचा अवलंब करून पर्यावरण संरक्षण हाच जीवनाचा अविभाज्य भाग होण्यासाठी सर्वांनी आग्रही असावे, असे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी येथे जिल्हा प्रशासनामार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोगाबाबा टेकडी हरीतकरण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमास पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, इको बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पी. व्यंकटेश, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button