Kolhapur

सहजसेवेची निराधार व्यक्तीनां मायेची ऊब

सहजसेवेची निराधार व्यक्तीनां मायेची ऊब

कोल्हापूर ःआनिल पाटील

कडाक्याची थंडी त्यात वारा घोंगावत असताना खोपोली रेल्वे स्टेशन, शिळफाटा येथील बस स्थानक,श्री वीरेश्वर मंदिर परिसर आणि ठीकठिकाणी कुडकुडत झोपलेल्या निराधार,गरजू व्यक्तींच्या आणि आदिवासी बांधवांच्या अंगावर मायेचे पांघरून टाकण्याचा उपक्रम यावर्षीही राबविण्याचा संकल्प व त्याचा आरंभ खोपोली रेल्वे स्टेशन येथून दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजी झाला .सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहज सेवा फौंडेशनची टीमकडून हेमाताई चिंबुळकर आणि मॉन्टी भाई यांच्या सहकार्याने गरजूंना, उबदार पांघरून आणि कानटोप्या वाटायचे हे सलग चौथे वर्ष होते. या उपक्रमातून खरी सामाजिक सेवा घडत असल्याचे प्रतिपादन ठाणे अंमलदार पंकज खंडागळे यांनी केले. एकीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असताना सहज सेवा फौंडेशन,खोपोली यांच्याकडून दरवर्षी थंडीत हा उपक्रम राबविला जातो. अचानक आपल्या अंगावर पांघरलेले ब्लांकेट आणि कान टोपीची भेट मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात होते.
खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पंकज खंडागळे,रोहन भोईर यांनी व्यस्त वेळातून फुरसत काढत या अभियानात सहभाग घेतला व सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,खजिनदार संतोष गायकर,बंटी कांबळे,निखिल ढोले,धनराज जंबगी,संदेश शेट्टे, आयुब शेख,अजय कांबळे,मनोज रुपवते,श्रीनिवास हंचलीकर,सलमान शेख, बी.निरंजन,अल्ताफ सय्यद,श्रावणी चिंबुळकर,धनश्री चिंबुळकर,भाग्यश्री चिंबुळकर,सुनील चिंबुळकर,स्वाती चिंबुळकर,
निहारीका जांभळे,यांनी हे वाटप केले. थंडीचा जोर अचानक वाढलेला होता, त्यामुळे या भेटीने सर्व जण आनंदी झालेले दिसले.
उपक्रम प्रमुख हेमाताई चिंबुळकर यांचा आज वाढदिवस असल्याने या उपक्रमात ही आगळीवेगळी सेवा करताना खूप आनंद वाटत असल्याची भावना व्यक्त केली.
*खोपोली व शीळफाटा परिसरात निवाराअभावी थंडीत कुडकुडत झोपणाऱ्या व्यक्तींना ब्लॅंकेट पुरविले जाईल, असे आवाहन सहजसेवा फौंडेशन, खोपोली यांनी केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button