Gevrai

गेवराई येथील ‘संकल्प अर्बन’ बँक व गटाची सकारात्मक उद्देशाने वाटचाल – सुभाष मुळे

गेवराई येथील ‘संकल्प अर्बन’ बँक व गटाची
सकारात्मक उद्देशाने वाटचाल – सुभाष मुळे

गेवराई : प्रत्येक घर स्वावलंबी, समृद्ध, सुखी आणि आर्थिक साक्षर बनवणे या उद्देशाने वाटचाल करणाऱ्या तीन महिला बचत गटांना ‘प्रेस क्लब’ चे अध्यक्ष सुभाष मुळे यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. सक्षमीकरणाच्या दृष्टिने गेवराई येथील ‘संकल्प अर्बन महिला को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या पदाधिकारी सौ. प्रियंका पंडित व सौ. सिमा पंडित यांच्यासह संचालक मंडळाने आता कटाक्षानं पाउले उचलली आहे. सुरु केलेला हा प्रगतीदायी उपक्रम स्तुत्यदायी असल्याचे सांगून या बँकेची सकारात्मक उद्देशाने वाटचाल असल्याचेही श्री. सुभाष मुळे यांनी यावेळी सांगितले.
गेवराई तालुक्यातील तीन महिला बचत गटांना संकल्प’ अर्बन महिला को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. गेवराई या बँक शाखेच्या वतिने ‘अर्धसाह्य’ वितरित करण्यात आले. यामध्ये गेवराई शहरातील मोहीनीराज महिला बचत गट तसेच तालुक्यातील भोगलगाव येथील त्वरिता महिला बचत गट आणि तुळजाई महिला बचत गटांचा समावेश आहे. बँकेचे अशोकराव पंडित तसेच सोपानराव मडके, शाखाधिकारी विशाल महामुनी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी शोभा जोशी, अश्विनी तुळजापूरकर, छाया राऊत, शेख फरजाना हुसेन, मंगल शिंदे तसेच आशाबाई मडके, उर्मिला गायकवाड, संजीवनी पांचाळ, तारामती मडके, शारदा मडके, मुक्ता मडके, सखुबाई गायकवाड आदींसह महीला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.
हा कार्यशील कार्यक्रमो यशस्वी करण्यासाठी संकल्प’ अर्बन महिला को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. गेवराई या बँकेचे कर्मचारी सौ. प्रीती महामुनी, कपील देशपांडे, प्रशांत फलके, सौ. शितल निर्मळ, कु. प्रिया बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

***

Leave a Reply

Back to top button