Gevrai

आय एम ए गेवराई शाखेचे उदघाटन

आय एम ए गेवराई शाखेचे उदघाटन

गेवराई : येथील सिंधी भवन येथे आय. एम. ए. गेवराई शाखेचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, सचिव डॉ. शिवाजी काकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. व्ही. चिंचोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, बीड आय एम ए अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर, माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय सिकची यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने होवून नंतर आय एम ए प्रेयर घेण्यात आली.
यावेळी डॉक्टर लोंढे यांनी संघटनेचे महत्व विषद करून संघटन कौशल्य वाढवण्याची व जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी गरजेच्या वेळी आय एम ए संघटना वैद्यकीय व्यावसायिकांच्या पाठीशी कशी उभी राहते हे उदाहरणासह नमूद केले. दरम्यान उपाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांनी आय एम ए द्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. सचिव डॉ शिवाजी काकडे यांनी आय एम ए कडून वैद्यकीय व्यावसायिकांसाठी चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गेवराईचे नूतन अध्यक्ष डॉक्टर जगदीश पोतदार यांनी आय एम ए च्या माध्यमातून विविध वैद्यकीय सामाजिक व संस्कृतीक कार्यक्रम राबवण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांनी विविध विषयांवरील सीएमई चे आयोजन करणे विविध शॉर्ट पीजी कोर्सेस चालू करणे, बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांविषयी तसेच कोरोना सारख्या कम्युनिकेबल आजारांविषयी जनजागृती करणे, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवादाचे आयोजन करणे वैद्यकीय व्यवसायिकायांसाठी कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक आदी कार्यक्रम यापुढे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ.पोतदार, उपाध्यक्ष डॉ.माने, सचिव डॉ.काकडे व कोषाध्यक्षपदी डॉ.लेंडगुळे आदींचे अभिनंदन करून कौतुक करण्यात आले.

***

Leave a Reply

Back to top button