Gevrai

गोदावरी मल्टीस्टेटचा मदतीचा हात

गोदावरी मल्टीस्टेटचा मदतीचा हात

सुभाष मुळे गेवराई

गेवराई : मराठवाड्यातील नामांकित आर्थिक संस्था असलेल्या गोदावरी मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा-गेवराई यांच्याकडून दिवंगत कै. ज्ञानोबा उमाजी राठोड सर यांच्या वारसदार पत्नी कमल ज्ञानोबा राठोड यांना एल आय सी विमा कंपनी व गोदावरी मल्टीस्टेट गेवराई यांच्याकडून ६ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती आमचे पत्रकार सुभाष मुळे यांनी दिली.
याप्रसंगी लातूर येथील सी ए विशाल चव्हाण सर, गोदावरी मल्टीस्टेटचे संस्थापक प्रभाकर पराड, संचालक प्रविण पंडित व गणेश शहाणे, सारंग देशपांडे, संतोष तुरे, दत्ता भिसे, विशाल ज्ञानोबा राठोड, शाखाधिकारी सौ. प्रतिक्षा मुळे व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button