Gevrai

गेवराई येथे बजरंग ग्रुप बचत गटाची स्थापना

गेवराई येथे बजरंग ग्रुप बचत गटाची स्थापना

सुभाष मुळे गेवराई

गेवराई : दिनांक २२ जानेवारी रोजी गेवराई येथील टीएमसी जातेगाव रोड येथे बजरंग ग्रुप ची बैठक जेष्ठ सदस्य वैजनाथ जीजा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन बजरंग गु्प बचत गटाची स्थापना करण्यात आली.
दरम्यान अध्यक्ष म्हणून बजरंग गु्प चे अध्यक्ष सुभाष मुळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष डॉ. गणेश मोटे, सचिव सखाराम कानगुडे, कोषाध्यक्ष राजाभाऊ पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आणि संचालक म्हणून शिवाजी आण्णा खिंडकर, भास्करराव नाना सुरवसे, राजु सोनी, संतोष सुतार, संजय गायकवाड, वैजनाथ चौधरी, जगन्नाथ जाधव, नारायण पवार इत्यादींची निवड करण्यात आली.
यावेळी किरण मदुरे, कैलास पट्टे, गोपालसेठ जाकीटे, सुभाष मुंदडा, गणेश कापसे, राधेश्याम खंडेलवाल, कृष्णा प्रधान, लक्ष्मण पवार, प्रभाकर कापसे, महेश कानगुडे, बाबासाहेब प्रधान, अशोक थोरात, शंकर गायकवाड, मधुकर बारगजे सर्व सदस्य उपस्थित होते. दरम्यान नविन कार्यकारणीचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, परमेश्वर गिरे, रामेश्वर कापसे, सय्यद मुसाभाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

***

Leave a Reply

Back to top button