Indapur

इंदापूर तालुक्यात काँग्रेस सक्षम पणे काम करेल : सत्यजित तांबे

इंदापूर तालुक्यात काँग्रेस सक्षम पणे काम करेल : सत्यजित तांबे

इंदापूर ता प्रतिनिधी दत्ताजी पारेकर

इंदापूर तालुका हा काँग्रेस पक्षाच्या कायम बालेकीला राहिलेला आहे . आज देखील येथे काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे . येणाऱ्या काळात देखील काँग्रेस पक्ष सक्षम पणे इंदापूर तालुक्यात काम करेन.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी इंदापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांच्या हस्ते तालुका व शहर युवक काँग्रेसची नियुक्ती पत्र देण्यात आली. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज संसतेथ जास्तीत जास्त युवकांना प्राधान्य देण्यात येणार आहे . पक्ष पुडील काळात सर्व स्थरावर सक्षम पणे काम करेल. त्यांनी अध्यक्ष स्वप्नील सावंत व सर्व काँग्रेस कमिटीच्या कामाचे कौतुक केले .
या वेळी पुणे मा न पा चे नगरसेवक अविनाश बागवे, काँग्रेस तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, तानाजी भोंग, जकीर काझी,भगवान पासगे,राहुल आचरे,बिभीषण लोखंडे, संतोष शेंडे, प्रदीप शिंदे, चेतन कोरटकर , चमन भाई बागवान, सुफियांनखान जमादार, नितीन राऊत, राहुल जाधव, अरुण राऊत, गोविंद खटकदौंड,शब्बीर ब्यापारी, महेश भागात, अक्षय शेलार, शंभूराजे साळुंखे, अतुल चव्हाण, सुरेश लोखंडे, भूषण बोराटे, दत्तू देवकर, नागनाथ देशमुख , संभाजीराजे जगताप ,वीरधवल गाडे आदी उपस्तीथ होते.
सूत्रसंचालन शहर युवक अध्यक्ष उजिर शेख तर आभार तालुका युवक अध्यक्ष अमोल बंडगर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button