Surgana

कठोर मेहनत,जिद्द, खेळाची आवड असल्याने ४२ वर्षीय विवाहितेची गरुड भरारी.. दक्षिण कोरियाच्या आशिया पॅसिफिक मास्टर खेळासाठी निवड. मंगला आज होणार दक्षिण कोरिया साठी रवाना..

कठोर मेहनत,जिद्द, खेळाची आवड असल्याने ४२ वर्षीय विवाहितेची गरुड भरारी..
दक्षिण कोरियाच्या आशिया पॅसिफिक मास्टर खेळासाठी निवड. मंगला आज होणार दक्षिण कोरिया साठी रवाना..

सुरगाणा ता. १०/५/२०२३

अंगी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी, परिश्रम, कष्ट करण्याची तयारी असते तर आकाशाला ही सहज गवसणी घालता येते. कोणतेही यश संपादन करायचे, मिळवायचे असेल तर वयाचे बंधन, लाजरे बुजरेपणा, मी विवाहिता आहे. मला कोण काय म्हणतील या सर्व बाबी विचारात न घेता कार्य केले तर मनातील जिद्द व चिकाटीने सहजपणे खेळ, व्यवसाय, शिक्षणामध्ये यशस्वी होता येते. सुरगाणा तालुक्यातील पालविहीर येथील ४२ वर्षीय विवाहिता मंगला नामदेव गावित/ बागुल यांनी वयाची बंधने झुगारून घवघवीत यश संपादन केले आहे.आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत.
दक्षिण कोरियातील जोनबक येथे होणाऱ्या आशिया पँसिफिक मास्टरर्स गेम्स इंटरनॅशनल स्पर्धेसाठी
निवड झाली असून १२ ते २० मे २०२३ दरम्यान होणाऱ्या एथेलॅटिक्स(रनिंग) स्पर्धेत त्या सहभागी होणार आहेत. ११ते १४फेब्रुवारी २०२३ दरम्यान
बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी उत्तर प्रदेश
येथे संपन्न राष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेत ४० वर्षे वरील महिला गटात पाच किलोमीटर धावणे सुवर्ण पदक, चारशे व दोनशे मीटर धावणे कांस्य पदक, चार बाय शंभर मीटर धावणे सुवर्ण पदक जिंकले आहे. दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या एशिया पॅसिफिक मास्टर खेळासाठी निवड झाली आहे.
४० वर्षावरील वयोगटातील स्पर्धेत शंभर, दोनशे, चारशे, आठशे, पंधराशे मीटर धावणे स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.
मंगला दामोदर बागुल या वणी जवळील संगमनेर या गावच्या तर त्यांचे सासर सुरगाणा तालुक्यातील पालविहीर येथील नामदेव महादू गावित या प्राध्यापका बरोबर त्यांचा विवाह झाला. आज त्यांना
दोन मुले अपत्ये आहेत.त्याचा न्यूनगंड न बाळगता त्यांनी सातासमुद्रापार यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे. आई वडील शेती करीत असल्याने शेतातील काम करणे, डोक्यावर हंडे ठेवत पाणी भरणे, गुरे चारणे, सांभाळणे, शेणाने घर सारवणे, गवत आणणे, स्वयंपाक करणे, आदी कामे करावी लागत असत.
त्यांना शालेय जीवनापासून खेळाची आवड होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली चिकाटी, खेळाची आवड, काटकपणा, कला, नृत्य, संगीत अंगी असलेले कला कौशल्याचा विकास व्हावा यासाठी नाशिक जिल्हा परिषदे मार्फत दरवर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा शाळा, केंद्र, बिट, तालुका, जिल्हा स्तरावर आयोजन करण्यात येते. याच स्पर्धेच्या आवडीने २००३ मध्ये जिल्हा स्तरावर मंगला यांची मुलींच्या गटात ४०० मीटर मध्ये निवड झाली होती. तेथे जिल्हा स्तरावर पहिले बक्षीस मिळाले होते. त्यांनी संगमनेर येथून वणी येथे रोजच पायपीट करीत माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पुढील शिक्षण नाशिक येथे घेतले आहे. बालवयातच खेळाची आवड आज आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेली आहे. मंगला बागुल या दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेत माध्यमिक विद्यालयात इंग्रजी विषयाच्या शिक्षिका आहेत.
यापुर्वी त्यांनी मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत २०२१ मध्ये सहभागी होऊन राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्यांनी अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सहभागी होत पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नितीन ठाकरे,
महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उत्तम वाघमारे, रतन चौधरी, पांडुरंग पवार, तुकाराम भोये, मनोहर चौधरी, परिणाम गावित, भास्कर बागुल,
कृष्णा देशमुख, देविदास देशमुख महाराष्ट्र राज्य
आदिवासी बचाव अभियानचे अध्यक्ष अशोक बागूल, ज्ञानेश्वर गायकवाड , योगेश भोये,हिरामण जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.

फोटो-
*मंगला बागुल वाराणसी येथे मॅरेथॉन स्पर्धेतील पारितोषिके स्विकारतांना.
* मंगला बागुल परिवारासह.

प्रतिक्रिया-
” महिलांनी आपल्या कोणत्याही क्षेत्रातील कार्यात यश मिळवायचे असेल तर आपण महिला आहोत आपल्यात काही तरी कमी आहे. आपल्यातील संकोच, लाजरेपणा, न्यूनगंड या गोष्टींना जीवनात थारा देऊ नये अपार मेहनत करण्याची तयारी व जिद्द ठेवली तर महिलांना कोणतेच क्षेत्र अवघड नाही. ग्रामीण आदिवासी भागातील मुली,महिला काटक, कणखर असतात. वय झाले असले तरी संसाराच्या गराड्यात अडकून न पडता अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा
क्षेत्रात कार्य करीत नाव कमावता येते. त्या करीता सर्व प्रथम न्यूनगंड मनातून काढून टाकावा.
मंगला बागुल.
अॅथलेटिक्स

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button