Surgana

अतिदुर्गम भागातील रानपाडा व पायरपाडा पुलाचे काम मुख्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करून मार्गी लावणार”- भाऊलाल तांबडे.

अतिदुर्गम भागातील रानपाडा व पायरपाडा पुलाचे काम मुख्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करून मार्गी लावणार”- भाऊलाल तांबडे.

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी जनता विकासापासून कोसो दूर आहे. येथील लोकप्रतिनिधींनी आदिवासी जनतेची फसवणूक करुन फक्त मतांचा जोगवा मागून निवडणूका जिंकून सत्ता उपभोगली आहे. येथील जनतेच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. अतिदुर्गम भागातील रानपाडा व पायरपाडा हे पाडे अजूनही विकासापासून वंचित आहेत. येथील नागरिकांना पावसाळ्यात अजूनही जीव धोक्यात घालून नार नदीच्या पुरातून प्रवास करावा लागतो आहे.या दोन्ही पाड्यावर शंभर टक्के आदिवासी समाज आहेत. रानपाडा व पायरपाडा हे दोन्ही पाडे पळसन व माजी आमदार यांच्या अलंगुण या गावापासून अवघे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहेत. परंतु या गावात पोहचण्यासाठी नार या नदीवर अद्याप तरी कोणत्याही प्रकारचा पुल अथवा रस्ता गावाला जोडलेला नाही. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांना पावसाळ्यात चार ते पाच महिने नदीच्या पुरातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. आज पर्यंत कित्येकांना पुराच्या पाण्यात आपला जीव गमवावा लागला आहे. रानपाडा येथील शालेय विद्यार्थ्यांना मुलींना अलंगुण येथे जाण्यासाठी पुरातून प्रवास करावा लागतो. पायरपाडा येथील विद्यार्थ्यांना पळसन येथे शिक्षणासाठी नार नदीच्या पुरातून पोहत प्रवास करावा लागतो आहे. नदीला पाणी असल्याने दररोजच शाळेत, महाविद्यालयात जाणे साठी पाच ते सात किलोमीटरहून अधिक पायपीट करावी लागते आहे. दरदिवशी ७० ते ८० विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेतून ये जा करीत आहेत. याच नार नदीतून गरोदर महिला,वयोवृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरुन नार नदीतून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात शेती कामात अथवा सर्प दंश झाला तर नदीतून डोली करून रुग्णांना रुग्णालयात घेऊन जावे लागते. पुराचे पाणी असल्याने चार महिने रेशनिंग आणता येत नाही. परिणामी मजूरांवर उपासमारीची वेळ येते. रानपाडा व पायरपाडा हे दोन्ही पाडे नार नदीच्या काठावर वसली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात तालुक्याशी नेहमीच संपर्क तुटत असतो. त्यामुळे नार नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी
सुरगाणा तहसीलदार सचिन मुळीक याच्यासह तालुका प्रमुख हरिभाऊ भोये,
उपविभागीय अधिकारी सा.बा.उपविभाग क्रमांक.२ चे अधिकारी जगदीश वाघ.तसेच सहायक अभियंता संदिप उघडे. कनिष्ठ अभियंता हेमत केकान,जिल्हा परिषदचे
इ.व.द चे शाखा अभियंता ऋषिकेश गरूड.पंचायत समितीचे अतिरिक्त गटविकास अधिकारी काशिराम गायकवाड आदींनी नदीतील पुलाच्या जागेची पाहणी केली.

” स्वातंत्र्य मिळाले त्याला ७५ वर्षे लोटली. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.मात्र सुरगाणा तालुक्यातील आदिवासी समाज अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. रानपाडा व पायरपाडा गावातील ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव मुठीत धरुन नार नदीच्या पुरातन प्रवास करावा लागतो.या दोन्ही पुलाकरीता १२ कोटींचा निधी अंदाज पत्रकात धरला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवडणूका जिंकून सत्ता उपभोगून सामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याच पाठपुरावा करून आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल “- भाऊलाल तांबडे.
बाळा साहेबांची शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख.

” आम्ही कित्येक वर्षांपासून लोकप्रतिनिधीकडे पुलाची मागणी करत आलो आहोत. लोकप्रतिनिधीं फक्त निवडणूकीत मताचा जोगवा मागण्यासाठी येतात. तेवढ्या पुरते आश्वासन देतात निवडून आल्यानंतर मतदारांच्या तोंडाला पाने पुसली जातात. पावसाळ्यात खुपच हाल अपेष्टांना सामोरे जावे लागते. बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे तसेच तालुका प्रमुख हरिभाऊ भोये.आमच्या मदतीला धावून आले आहे.आशा आहे आता तरी आमचे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे ग्रहण सुटेल अशी आशा बाळगून आहोत.”

नारायण माळघरे- सामाजिक कार्यकर्ते. रानपाडा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button