Surgana

सुरगाणा तालुक्यात पदवीधर निवडणूक ५३ टक्के मतदान.

सुरगाणा तालुक्यात पदवीधर निवडणूक ५३ टक्के मतदान.
ता.३०/१/२०२३

तालुक्यात विधान परिषदेच्या
पदवीधर निवडणूकीत मतदान शांततेत पार पडले.सकाळ सत्रात थंडी असल्याने मतदान थंडावले होते.दुपारी एक वाजे नंतर मतदार मतदान केंद्रांवर पहावयास मिळाले.मतदान प्रक्रियेत तरुण युवकांचा सहभाग दिसून आला.केंद्र निहाय मतदान
सुरगाणा केंद्र एकुण मतदान ५५६ पैकी २८६ झाले.बोरगाव २३२ पैकी १०९,बा-हे १३४ पैकी ८९,उंबरठाण केंद्र २५६ पैकी १४०,तालुक्यात एकुण पदवीधर निवडणूक ९३९ पुरुष मतदार तर २३९ महिला मतदार असे ११७८ मतदार होते.यापैकी ५३७ पुरुष तर ८७ महिला असे ६२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सुरगाणा केंद्रावर शिक्षक रतन चौधरी यांनी आठ वाजेच्या दरम्यान प्रथम मतदानाचा हक्क बजावला. दिंडोरी लोकसभेचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिक येथून सुरगाणा तहसील कार्यालयात केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला. सुरगाणा केंद्रावर केंद्राध्याक्ष हेमंत बागुल,मतदान अधिकारी संजय पवार,बी.एस.वाघ, डी.बी.डोंगरे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.तर
निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार सचिन मुळीक,नायब तहसिलदार राजेंद्र मोरे यांनी निवडणूकीचे काम यशस्वीपणे पा शांततेत पार पडले.

फोटो-
* सुरगाणा मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतांना माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण.
* मतदान केंद्रांवर रांगेत उभे असतांना / मतदान केल्याचे दर्शवितांना माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण.

चौकट
” मतदान केंद्रांत भ्रमणध्वनी बाळगण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध घातला होता. यावेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना होमगार्डने भ्रमणध्वनी मतदान केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करताच भ्रमणध्वनी मतदान केंद्रांबाहेरच ठेवत मतदान केंद्रात प्रवेश केला. नियमांचे काटेकोरपणे व तंतोतंत पालन करतांना यावेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कडून दिसून आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button