Aurangabad

सुंदर, गुणवत्तापूर्ण घरांची स्वप्ने म्हाडाच्या माध्यमातूनच पूर्ण – पालकमंत्री देसाई

सुंदर, गुणवत्तापूर्ण घरांची स्वप्ने म्हाडाच्या माध्यमातूनच पूर्ण – पालकमंत्री देसाई

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) सुंदर, सुबक, गुणवत्तापूर्ण अशा प्रकारची हक्काच्या घरांची स्वप्ने पूर्ण करून देते.

यासाठी पारदर्शक अशा लॉटरी पद्धतीने विजेत्यांची निवड करते. आगामी काळातही औरंगाबादेतील विविध नियोजित योजना गतिमानतेने म्हाडा पूर्ण करेल, असा विश्वास उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद‍ गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या औरंगाबाद, हिंगोलीतील सदनिकांच्या विविध योजनेंतर्गत 864 सदनिकांच्या ऑनलाईन सोडत कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून देसाई ऑनलाइन बोलत होते.

औरंगाबाद येथील म्हाडा कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. शेटे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अनिल थोरात आदींची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button