Solapur

डॉ. विलास काळे यांना लोकमंगल फाउंडेशन चा शिक्षक रत्न पुरस्कार प्रधान

डॉ. विलास काळे यांना लोकमंगल फाउंडेशन चा शिक्षक रत्न पुरस्कार प्रधान

सोलापूर : अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास उमराश काळे यांना लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था नि., सोलापूर व लोकमंगल फाउंडेशन सोलापूर शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार लोकमंगल फाउंडेशन चे मार्गदर्शक मा. आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते मिळाला. या कार्यक्रमासाठी डॉ. ह. ना. जगताप, डॉ.अशालता जगताप, श्री. जोशी सर उपस्थित होते.
डॉ. विलास काळे यांनी शैक्षणिक कार्य पार पाडत असताना स्वतःची शिक्षण क्षेत्रातील अत्युच्च विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये विविध विषयावर संशोधनात्मक लेख लिहून प्रसिद्ध केले आहेत. विविध वृत्तपत्रे, साप्ताहिक, मासिके यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयावर लेखन करून शैक्षणिक व सामाजिक कार्य केलेले आहे. त्यांनी स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, स्वच्छ भारत मिशन, महाश्रमदान यासह रक्तदान शिबिरे, रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. केंद्र अरणमध्ये विविध विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी व शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावलेला आहे. शिक्षकांचे व्यक्तिमत्व सुधार, शिक्षकांच्या विविध कार्यशाळा घेऊन शिक्षकांना प्रोत्साहित केलेले आहे. शाळा बंद पण शिक्षण चालू काळामध्ये ऑनलाइन -ऑफलाईन शिक्षण विद्यार्थ्या पर्यंत पोचविणे बाबत विशेष प्रयत्न करणे. लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी विविध गावांमध्ये लसीकरण कॅम्प प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने आयोजित करणे. कोविड -१९ बाबत कार्यशाळा, मार्गदर्शन, जनजागृती, घ्यावयाची काळजी, माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवणे या सर्व बाबींचा विचार करून लोकमंगल फाउंडेशन सोलापूर तर्फे शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यासाठी विजय काळे, गणेश पवार, सचिन पवार, नवनाथ गेंड, तानाजी इंगळे, नवनाथ शिंदे, सोपान मोहिते, संतोष भोरे सह शिक्षक उपस्थित होते. त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button