Solapur

गणेश पवार यांना रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते सत्कार

गणेश पवार यांना रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते सत्कार

सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा समन्वयक आणि भैरवनाथ शुगर फॅक्टरीचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी गणेश पवार यांचा सत्कार केला. प्रेरणा घेणे व प्रेरणा देणे व जाहिरात मुक्त दैनिक पीडीएफ रयतेचा कैवारी ऑनलाइन वृत्तपत्र या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या पुरस्काराचे वितरण 12 डिसेंबर रोजी झाले. रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्कार वितरण सोहळा आशिया खंडातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेले महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या के टी एच एम महाविद्याल, नाशिक येथील सुसज्ज सभागृहात मान्यवर अतिथींच्या मार्गदर्शखाली उत्साहात संपन्न झाला. शिक्षक आमदार मा. सुधीर तांबे, आशिया खंडातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक बी. बी. गुंजाळ, गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे, जावळे साहेब, प्राचार्य भगवानसिंग राजपूत, ज्येष्ठ अधिव्याख्याता डी. डी. सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले, विलास काळे केंद्रप्रमुख, नवनाथ जाधव, राजकवी ख. र. माळवे ( खरमा ) रयतेचा कैवारीचे संपादक शाहू भारती, उपसंपादक संजय येशी, सर्व संपादक मंडळ, विभाग प्रमुख यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हयांचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी, पुरस्कारार्थी आदि मान्यवर उपस्थित होते. रयतेचा कैवारीचे विभागीय प्रतिंनिधी आदरणीय बालाजी नाईकवाडी सरांनी सर्व मान्यवरांना स्वलिखित पुस्तक भेट देऊन आपल्या दातृत्वाचा परिचय सर्वांना दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button