Maharashtra

चांदवड शहरात आस्थापनांची वेळ वाढविण्याची मागणी

चांदवड शहरात आस्थापनांची वेळ वाढविण्याची मागणी

उदय वायकोळे

चांदवड शहरातील नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी यांच्यातर्फे चांदवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांना निवेदन देण्यात आले. यात नमूद केले आहे की
चांदवड शहरात अजूनही आस्थापना 9 ते 5 या वेळेतच सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने 5 ऑगस्ट 2020 पासून सर्वच शहरांमध्ये व्यवसाय आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे,परंतु चांदवड शहरात 9 ते 5 कसे? असा प्रश्न अनेक व्यावसायिकांना पडला तरी 5 ऑगस्ट 2020 च्या राज्य शासनाच्या निर्णयाच्या आधारे चांदवड शहरात सुद्धा सर्व व्यावसायिक दुकानदारांना दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत होणेसाठी सुधारीत वेळेची माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे.यावेळी नगरसेवक जगन्नाथ(आबा) राऊत,शिवसेना शहरप्रमुख संदीप उगले,राहुल हांडगे,सुनील बागुल आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button