Solapur

सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या संपूर्ण विकासासाठी कटीबद्ध; खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर.

सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या संपूर्ण विकासासाठी कटीबद्ध; खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर.

प्रतिनिधी
रफिक अत्तार

माढा मतदारसंघातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. जे. पी. नड्डा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा व सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, स्वराज पतसंस्थचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते यांची प्रमुख होती.आगामी काळामध्ये सातारा व सोलापूर जिल्हे हे कृषी उत्पादक जिल्हे म्हणून संपूर्ण देशामध्ये ओळखले जाणार आहेत. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांच्यासाठी कृषी प्रक्रिया उभा राहत आहे. सदरील उद्योगाच्याद्वारे कृषी व भाजीपाला निर्यात होण्यास मदत नक्कीच होणार आहे. संपूर्ण मधील ७० % हुन अधिक देशामध्ये मान्यता असलेली निर्यात प्रक्रिया सदरील कृषी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून होणार आहे. त्याचा नक्कीच फायदा हा सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्याला होईल, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.मुंबई ते हैद्राबाद अशी जाणारी बुलेट ट्रेन हि माढा मतदारसंघातून जात आहे. व माढा मतदारसंघामध्ये नक्कीच त्याचे थांबे असणार आहेत. बुलेट ट्रेनच्या मदतीने फलटण वरून मुंबईला जाण्यासाठी जास्तीत जास्त दोन तास लागू शकतात व पुणे तर साधारण चाळीस मिनिटामध्ये जाऊ शकणार आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा हा बदललेला नक्कीच दिसणार आहे. सातारा व सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व जण कार्यरत राहणार आहोत, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यातील उपळवे येथे आशिया खंडातील सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प हा “स्वराज व प्राज” ह्या कंपनीच्या माध्यमातून उभारला जात आहे. त्याचे कामकाज सुद्धा सुरु झालेले आहे. सदरील प्रकल्पामुळे फलटण तालुक्यासह माण व खटाव तालुक्यामध्ये सुद्धा रोजगार निर्मिती हि मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या सोबतच सदरील कंपनींच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुद्धा अनेक व्यवसाय सुरु होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील युवकांना आगामी काळामध्ये नक्कीच चांगल्या संधी मिळतील यात कसलीही शंका नाही, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.मी खासदार म्हणून निवडून आल्यापासून अनेक वर्ष प्रलंबित असलेली सर्व कामे तातडीने मार्गी लावली आहे. जर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले असते तर नक्कीच विकासकामांना अधिक गती मिळाली असती. नीरा – देवधरचे अतिरिक्त पाण्याचा प्रश्न असो किंवा अनेक वर्षे रखडलेला रेल्वेचा प्रश्न, जिहे – कठापूरचा प्रश्न, पालखी महामार्गाचा प्रश्न असे अनेक प्रश्न आपण मार्गी लावलेले आहेत. आगामी काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जिहे – कठापूरचा हा प्रश्न मार्गी लागत आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
आगामी होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ह्या भारतीय जनता पार्टी हि संपूर्ण ताकदीने लढवणार आहे. फलटण शहरासह तालुक्याचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. निवडणुका घोषित झाल्यानंतर त्यावेळच्या परिस्थितीनुसार योग्य ते निर्णय घेवून भारतीय जनता पार्टीचा झेंडा फलटणमध्ये फडकणार आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button