Faijpur

देशातील प्रत्येक बहिणीच्या सुरक्षेची हमी घ्यावी डॉ जी पी पाटील

देशातील प्रत्येक बहिणीच्या सुरक्षेची हमी घ्यावी
डॉ जी पी पाटील

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचे, स्नेहाचे व सुरक्षिततेचे नाते रक्षाबंधन उत्सवाच्या रूपाने समाजासमोर आदर्श प्रस्थापित करते. आपल्या समाजातील प्रत्येक बहिण सुरक्षित राहील अशी हमी प्रत्येक तरुणाने घ्यावी असे मत व्यक्त करीत भारत भूमीच्या सुरक्षेसाठी अहोरात्र प्राणपणाने सेवा बजावणाऱ्या वीर सैनिकांप्रती सन्मान व आदर व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित एनसीसी कॅडेट्सना रक्षाबंधन या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले. माजी प्राचार्य तथा कार्यकारिणी मंडळ सदस्य डॉ जी पी पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त केले. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी अशुरंस सेल (आय क्यू ए सी ), विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ ए आय भंगाळे, उपप्राचार्य डॉ एस व्ही जाधव, श्री सतीश पाटील कॉन्ट्रॅक्टर, डॉ कल्पना पाटील हिंदी विभाग प्रमुख तथा आय क्यू ए सी क्रायटेरिया सदस्य, डॉ ताराचंद सावसाकडे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा आय क्यू ए सी सदस्य, डॉ विजय सोंजे विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ, सीमा बारी, डॉ दीपक सूर्यवंशी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा धीरज खैरे, प्रा कामिनी पाटील, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांच्यासहित एनसीसी कॅडेट्स विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ ए आय भंगाळे यांनी म्हटले की, देशाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या वीर सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करतांना कर्तव्यामुळे परिवारासोबत विविध सण उत्सव साजरे करता येत नाहीत मात्र एनसीसी कॅडेटसच्या माध्यमातून सैनिकांप्रती आदरभाव व सन्मान व्यक्त करण्याच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले. यासोबत प्रत्येक देशवासीयाने वीर सैनिकांप्रती आदरभाव राखावा व आपण ज्याठिकाणी आहोत तेथून देशहिताचे कार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी छाया आणि श्रुती या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केलीत. त्यात एनसीसी कॅडेटसच्या मनगटावरती राखी बांधताना जणू आपण एका सैनिकाच्या मनगटावर राखी बांधत आहोत अशी भावना व्यक्त करून महाविद्यालयाने अशी सुसंधी उपलब्ध करून दिली याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी तर आभार डॉ सीमा बारी यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button