Faijpur

नाहाटा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दीन व ऑगस्ट क्रांती दिन साजरा

नाहाटा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दीन व ऑगस्ट क्रांती दिन साजरा

फैजपूर(प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, समाजशास्त्र मंडळ व विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. स्वप्नील चामणीकर हे लाभले होते. व त्यांच्या सोबतीला श्री.विठ्ठल म्याकलवाड, सौ. चित्रा पुराणिक , सौ. भंडारी , श्री. प्रवीण दांडगे, जिवन दीक्षत हे देखील आले होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्हीं. पाटील तसेच उपप्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी त्यांच्या समवेत रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. महिरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ममताबेन पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.व्ही.ए.सोळुंके तसेच इतर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा.व्ही.ए.सोळुंके यांनी सूत्रसंचालनाने केली. रा.से.यो.चे.प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.आर.एस.नाडेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर श्री.विठ्ठलजी म्याकलवाड यांनी आजच्या प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. कु. अश्विनी झोपे या रासेयो स्वयंसेवक हिने भगवान बिरसामुंडा यांच्या बदल भाषण दिले. या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री.स्वप्नील चामणेकर यांनी थोर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या कार्याचा मागवा घेतला. तसेच इतर सातपुड्यातील व सह्याद्रीच्या खोऱ्यातील क्रांतिकारकांच्या कार्यावर प्रकाश टाकला. भगवान बिरसा मुंडा बद्दल संपूर्ण माहिती ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शन डॉ. विलास महिरे यांनी केले.
कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रफुल वाघमारे,नीरज सावकारे,चेतन चौधरी,मानसी वाघ, अश्विनी झोपे, गंगा ढाके इ.उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. डॉ. जे.एफ.पाटील, प्रा.के.के.आहिरे, प्रा. एस. पी. झनके, प्रा. एस.के.राठोड, प्रा. डॉ.राजेंद्र तायडे, प्रा. स्मिता चौधरी व इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button