Nagpur

आदिवासी विकास मंत्री अँड. के.सी.पाडवी यांच्यासोबत आदिवासी समस्या बद्दल बिरसा क्रांती दलाची बैठक

आदिवासी विकास मंत्री अँड. के.सी.पाडवी यांच्यासोबत आदिवासी समस्या बद्दल बिरसा क्रांती दलाची बैठक

नागपूर / प्रतिनिधी – अतुल कोवे

आदिवासी विकास मंत्री अँड. आदरणीय नामदार के.सी. पाडवी यांच्यासोबत बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी आदिवासी विकासाच्या संदर्भात काही धोरणात्मक मुद्यांवर सविस्तर बैठक उत्साहात पार पडली.

आदिवासी विकास मंत्री अँड. के.सी.पाडवी यांच्यासोबत आदिवासी समस्या बद्दल बिरसा क्रांती दलाची बैठक

? जनजाती सल्लागार परिषदेवर आदिवासींमधील जाणकार व्यक्ती नियुक्त करणे. शासकीय सेवेतील आदिवासींचे आरक्षण तात्काळ भरणे व बोगस आदिवासींना तात्काळ हटविणे.

? आदिवासी युवक-युवतींना उद्योगधंद्यासाठी प्रशिक्षण व अनुदानासह निधी उपलब्ध करून देण्यात यावा. आदिवासी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात यावा व तो आदिवासी योजनांवर खर्च करण्यात यावा. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सर्व समित्यांवर आदिवासी प्रतिनिधी नियुक्ती करणे. आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यस्तरावर आदिवासी आयोग निर्माण करण्यात यावा.

? जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदिवासी मुला मुलीचे शासकीय वस्तीगृहाच्या इमारतींचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यात यावी. आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजनांची अत्यंत गांभीर्यपूर्वक अंमलबजावणी करणे.

त्यावेळी बिरसा क्रांती दल राज्य उपाध्यक्ष उत्तम कन्नाके, विदर्भ संघटक अतुल कोवे उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button