Pune

हातवीज येथील विशेष गाव बैठकीत एक मताने पारित इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करून वनहक्क व पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा ठराव

हातवीज येथील विशेष गाव बैठकीत एक मताने पारित इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करून वनहक्क व पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा ठराव

पुणे – प्रतिनीधी दिलीप आंबवणे

भीमाशंकर अभयारण्य लगतच्या पुणे , रायगड व ठाणे जिल्ह्यातील ४२ गावातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट गावातील इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करून तेथे वनहक्क व पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याचा ठराव हातवीज येथील विशेष गाव बैठकीत एक मताने पारित करण्यात आला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करत आवश्यक काळजी घेवून हातवीज येथील ग्रामस्थांनी विशेष गाव बैठकीचे आयोजन केले होते. ग्रामस्थांनी सोसिअल डिस्टनसिंग पाळून, मास्क लावून, सॅनिटायझर वापर करून योग्य ती काळजी घेतली.

आदिवासींच्या जंगलावरील हक्कांना मान्यता देण्यासाठी व त्यांच्या प्रथा परंपरा यांचे संरक्षण करण्यासाठी वनहक्क कायदा व पेसा कायदा असे दोन महत्त्वपूर्ण कायदे केंद्र शासनाने पारित केलेले आहेत. यापैकी वनहक्क कायद्यामध्ये वनांचे व जैवविविधतेचे संरक्षण संवर्धन करण्याची जबाबदारी ही स्थानिक लोकांवर टाकली आहे. तर पेसा कायद्यान्वये आदिवासींच्या रूढी-परंपरा, स्थानिक नियोजन व कायदे याबाबत ग्रामसभांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आदिवासींच्या स्थानिक जंगलांचे जैवविविधतेचे व पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या कायद्यात पुरेशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पुरेशा तरतुदी असताना, अशा प्रकारे अनुसूचीत क्षेत्रातील गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेश करणे ही बाब अन्यायकारक आहे, अशी मते सभेत मांडली गेली. सभेचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक माजी सरपंच नामदेव दगडू पारधी हे होते.आदिवासी उत्कर्ष संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप करवंदे, सोमनाथ निर्मळ, महादू सुपे, गोविंद निर्मळ यांनी मनोगते व्यक्त केली. सभेचे सुत्रसंचलन ग्रा. पं. सदस्य महादू निर्मळ यांनी केले तर समारोप बाळू करवंदे सर यांनी केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button