Buldhana

दिव्या फाउंडेशनने घेतले,सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकीला दत्तक !

दिव्या फाउंडेशनने घेतले,सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकीला दत्तक !

निकिता चे स्विकारले शैक्षणिक पालकत्व…

दत्तक पत्र देताना अशोक काकडे ,दिव्या फाऊंडेशन टीम

राजेश सोनुने

बुलडाणा : पवित्र शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एका पितृछत्र हरविलेल्या सावित्रीच्या लेकीला दत्तक घेत तिच्या उच्च शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी येथील दिव्या फाउंडेशनने अधिकृतपणे स्विकारली आहे. धावपळीच्या युगात सामान्य व्यक्तींनी मुलं दत्तक घेण्याची फारशी चर्चा होत नसते किंवा पुढे त्या मुलांचं काय होते, याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. मात्र, दिव्या फाऊंडेशनचे सामाजिक उपक्रम समाजासमोर आदर्शवत असल्याने संस्थेच्या प्रत्येक कार्याकडे विशेष लक्ष असते. चिखली तालुक्यातील सवणा गावची निकिता संजय पवार ही मुलगी दत्तक घेतली आहे. निकिताचे पितृछत्र हरविले. आई शारदा मोलमजूरी करुन मुलामुलींना जगवित आहे. मात्र त्यांच्या शिक्षणाचा भार उचलू शकत नाही.जीवघेण्या महागाईत ते शक्य ही नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात मुली प्रगती करीत असल्या तरी निकिताचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल का? असा प्रश्न उभा ठाकला असतांना दिव्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांनी निकिताच्या संपूर्ण शिक्षणासाठी तिला दत्तक घेण्याचा विधायक निर्णय घेतला. दत्तक घेण्यासंदर्भात मान्यताप्राप्त संस्थेत नोंदणी केली. शिवाय शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी असल्याचे पत्र व इतर अटी पूर्ण केल्याची प्रक्रीया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती उत्सवाच्या पावन पर्वावर पार पडली.यावेळी अशोक काकडे यांनी पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवु नका, परिवर्तन जर करायचे असेल शिक्षण आत्मसात करा, म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम होता येईल,असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी डॉ.गौतम अंभोरे, सुनिल तिजारे,निलेश शिंदे,संगीता राजपूत, ज्योती गवई बुलडाणा पोलीस, चंचल बागडे पोलीस,राजेन्द्र मोरे,सुधाकर मानवतकर,आशिष खडसे, मंगेश ठाकरे, गजानन अवसरमोल,मोहसिन खान, चंद्रकुमार बहेकर,उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button