Buldhana

➖ कर्फ्यूतील अवीट चव…➖

➖ कर्फ्यूतील अवीट चव…➖

राजेश सोनुने

‘ दिव्या फांऊ डेशन ’ ही निराधार, मनोरुग्णांच्या समस्यांचं निवारण व्हावं यासाठी पाठपुरावा करणारी संस्था आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, संचारबंदीच्या काळात भिक्षेकरी, मनोरुग्ण किंवा निराश्रीत, गरजूंच्या पोटप्रश्नसाठी
“कर्फ्यूतील अवीट चव” हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाचा हा मजकूर शेअर करून इतरांचीही उमेद वाढवा. तसंच कोणत्याही स्वरुपात दातृत्वाचे हात पूढे करून आपण या पूण्यकर्मात योगदान देवू शकता…

◆कोरोनाचा भारतात ज्या पद्धतीनं प्रादुर्भाव होतोय ते बघता , चिंता वाटत आहे …

जर आजच्यासारख्या कर्फ्युचा दीर्घकालीन प्रसंग उद्भवला तर आपण – घरं असलेले लोक , पैसे असलेले लोक स्वतःला घरात बंदिस्त करून हे संकटाचे दिवस घालवू शकू … परंतु हातावर पोट असणारे लोक ,बेघर लोक , प्रवास करू न शकल्याने विशिष्ट ठिकाणी अडकलेले लोक, भिकारी,मनोयात्री,प्राणी इत्यादींच्या जीवांचे अन्न आणि पाण्यामुळे हाल होणार आहेत . अशावेळी आपलं सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी सहृदय दिव्या फाऊंडेशन एक हात मदतीचा देण्यासाठी एक पाऊल टाकत आहे…

● भुकेलेल्याला अन्नदान करण्यासारखे दुसरे पूण्य नाही. “दानात पूण्य आणि सेवेत आनंद” असे ब्रिद घेऊन रस्त्यावरील भिक्षेकरी, मनोरुग्णांना अन्न वाटप करणार. तूम्ही पण करावे…

● आपल्या घराजवळ असा कोणी व्यक्ती भेटला किंवा आढळून आल्यास त्यांना दोन घास अन्नाचे सहकार्य करा…

● दिव्या फाऊंडेशनचा दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू आहे आणि पुढे चालू राहण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वाद लाभावे…

▪या यादीत अजून काही नियोजन करता येऊ शकल्यास आम्हाला सांगा नक्की आम्ही ती पूर्ण करू आपण ही पोस्ट पुढे पाठवावी … देशसेवेसाठी आत्तापर्यंत ज्यांना काही करता आलेलं नाही त्यांनी या विषयात भूमिका घेऊन,या आजाराच्या आणीबाणीच्या परीस्थितीत आपलं सामाजिक भान जोपासूया ! निरपेक्ष वृत्तीने व आत्मियतेने केलेल्या या अन्नदानाला स्वर्गीय चवीची गोडी आणूया !!

—-◆●◆——
आपले सेवक
दिव्या फाऊंडेशन महा.राज्य बुलडाणा,अशोक काकडे
9260008002

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button