Buldhana

उडान’ नारीशक्तीची भरारी… दिव्या फाऊंडेशन करणार “यशस्विनींचा” कार्यगौरव

उडान’ नारीशक्तीची भरारी…
दिव्या फाऊंडेशन करणार “यशस्विनींचा” कार्यगौरव

राजेश सोनुने

बुलडाणा : भारतीय संस्कृतीत नारीशक्तीला पूजनीय मानले गेलेले अाहे. अाज वेगवेगळी क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केली अाहेत. काेणतेही क्षेत्र त्याला अपवाद नाही. ८ मार्च हा दिवस यशाच्या अवकाशात उडान भरणाऱ्या स्त्रीत्वाचा उत्सव असल्याने व तिला सलाम ठोकण्याचा दिवस असल्याने येथील दिव्या फाउंडेशनच्या वतीने “उडान” नारीशक्तीची भरारी… या कार्य गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

८ मार्च जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा,
आत्मसन्मानाचा, आणि तिच्या कसोटीचाही उत्सव आहे. याच अनुषंगाने दिव्या फाउंडेशन अंतर्गत गर्दे हॉल येथे सकाळी १० वाजता होवू घातलेल्या कार्यक्रमाला अर्जुन पूरस्कार प्राप्त ललिता बाबर, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुमांन चंद्रा,उपविभागीय पोलिस अधिकारी गौरी सावंत,सह आयुक्त जी.एस.टी स्वाती थोरात, पतीच्या जीवन संघर्षासाठी ६५ वर्षीय मॅरेथॉन धावणारी आदर्श पत्नी लता भगवान करे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया ढाकणे, डॉ. प्रचीती पुंडे,चला हवा येऊ द्या फेम चैताली मानकर जिल्हा महिला न्यायाधीश,समाजसेविका पुणे माधुरी संतोष बारणे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ३ ते ४ सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व प्रशासकीय सेवेतील दिग्गजांची रेलचेल राहणार असून स्वागताध्यक्ष डॉ. वैशाली निकम ह्याआहे. बैठकी दरम्यान बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्व भारत देशात करीत असलेल्या कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा तसेच कायदेविषयक सल्ला परितक्त्या महिला घटस्फोटीत महिलांसाठी मार्गदर्शन व विविध विषयावरील चिंतनात्मक चर्चा असे कार्यक्रमाचे स्वरुप राहणार आहे. दरम्यान या सोहळ्यात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तसेच बुलडाणा जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिलांचा सुद्धा “राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार” तसेच “जिजाऊ कन्या पुरस्कार” देऊन सन्मान होणार आहे. सदर कार्यक्रमाला महिलांनी महाविद्यालयीन मुली, ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button