Buldhana

उडान नारीशक्तीची भरारी… सन्मान सोहळ्याच्या पूर्वतयारीला वेग स्वागताध्यक्षपदी डॉ. वैशाली निकम यांची निवड

उडान नारीशक्तीची भरारी… सन्मान सोहळ्याच्या पूर्वतयारीला वेग
स्वागताध्यक्षपदी डॉ. वैशाली निकम यांची निवड

राजेश सोनुने

बुुलडाणा : भारतीय संस्कृतीत नारीशक्तीला पूजनीय मानले गेलेले अाहे. अाज वेगवेगळी क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केली अाहेत. काेणतेही क्षेत्र त्याला अपवाद नाही. ८ मार्च हा दिवस यशाच्या अवकाशात उडान भरणाऱ्या स्त्रीत्वाचा उत्सव असल्याने व तिला सलाम ठोकण्याचा दिवस असल्याने येथील दिव्या फाउंडेशनच्या वतीने “उडान” नारीशक्तीची भरारी… या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर १६ फेब्रूवारीला स्थानिक विश्रामगृह येथे नियोजन बैठक पार पडली असून नियोजनाबाबत सर्वानुमते विविध ठराव घेण्यात आले.

८ मार्च जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा,
आत्मसन्मानाचा, आणि तिच्या कसोटीचाही उत्सव आहे. याच अनुषंगाने दिव्या फाउंडेशन अंतर्गत गर्दे हॉल येथे सकाळी १० वाजता होवू घातलेल्या कार्यक्रमाला अर्जुन पूरस्कार प्राप्त ललिता बाबर, पतीच्या जीवन संघर्षासाठी ६५ वर्षीय मॅरेथॉन धावणारी आदर्श पत्नी लता भगवान करे, एबीबीएसडीए डॉ. प्रचीती मुंडे, बुलडाणा पोलिस दलातील आर्चरी गोल्ड मेडेलिस्ट मोनाली जाधव, चला हवा येऊ द्या फेम चैताली मानकर यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ३ ते ४ सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व प्रशासकीय सेवेतील दिग्गजांची रेलचेल राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. वैशाली निकम यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. बैठकी दरम्यान बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्व भारत देशात करीत असलेल्या कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा तसेच कायदेविषयक सल्ला परितक्त्या महिला घटस्फोटीत महिलांसाठी मार्गदर्शन व विविध विषयावरील चिंतनात्मक चर्चा असे कार्यक्रमाचे स्वरुप राहणार आहे. बैठकीत विविध विषयावरची चर्चा होऊन रूपरेषा आखण्यात आली असून या बैठकीला दिव्या फाउंडेशन चे सदस्य पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी केले आहे.या बैठकीला डॉ. नंदिनी रिंढे अनिता कापरे मीना जगताप, संगीता राजपूत, श्वेता माळी, रंजना कायस्थ, अंजू जाधव कोकिळा तोमर, ज्योती गवई, विद्या वानखडे, पुनम डिडोळकर, संध्या फुंडे, वंदना भिसे, राजेंद्र टिकार सुनील तिजारे, अशिष खडसे मंगेश ठाकरे, निलेश शिंदे सुधाकर मानवतकर संजय जाधव, युवराज कापरे, सोनू कायस्थ,शैलेश खेडकर,सिद्धार्थ आराख, गजानन अवसरमोल आत्माराम झल्ट, चंद्रकुमार बहेकार,अशोक काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button