World

Big Breaking: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरच अटक..!

Big Breaking: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरच अटक..!
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्सकडून अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ही अटक करण्यात आली आहे. खान यांना इस्लामाबाद येथील कोर्टाबाहेरून अटक करण्यात आली आहे.
डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. अटकेबाबत अधिक तपशील अद्याप मिळालेला नाही. इम्रान खान उच्च न्यायालयात बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी आले होते, तेव्हा पाकिस्तानी रेंजर्सकडून ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीटीआय)चे नेते मुसर्रत चीमा यांनी दावा केला आहे की इम्रान खान यांना टॉर्चर केले जात आहे. पक्षाने असाही दावा केला आहे की खान यांच्या वकीलाला मारहाण देखील झाली आहे आणि ते गंभीर जखमी झाले आहेत.
इम्रान खान यांची अटक लाहोरमधील रॅलीनंतर झाली आहे ज्यात त्यांनी लष्करावर गंभीर आरोप केले होते. या रॅलीत इम्रान यांनी माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्यावर हल्ला चढवला होता.
इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी ट्विट करून खान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी यांनी ट्विट करून सांगितले की, इम्रान खान सध्या उच्च न्यायालयात रेंजर्सच्या ताब्यात आहेत आणि वकिलांना टॉर्चर केले जात आहे. इम्रान खान यांच्या गाड्यांना घेरण्यात आले होते.

दरम्यान पीटीआयचे अन्य एक नेता अजहर मशवानीने आरोप केला आहे की, इम्रान यांचे रेंजर्सनी अपहरण केले आहे. त्यांनी देशभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. इम्रान खान यांच्या अटकेच्या आधी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे सह अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी खान यांनी लष्करावर केलेल्या गंभीर आरोपाची निंदा केली होती. पीटीआयच्या प्रमुखाने देशातील संस्थांना बदनाम करण्यासाठी खालची पातळी गाठली आहे, अशी टीका झरदारी यांनी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button