Buldhana

गो- कोरोनाचा जागर करीत दिव्या फाऊंडेशनने वाटले निशुल्क मास्क – बसचालक, वाहक, पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरीकांनी घेतला लाभ

गो- कोरोनाचा जागर करीत दिव्या फाऊंडेशनने वाटले निशुल्क मास्क
– बसचालक, वाहक, पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरीकांनी घेतला लाभ

राजेश सोनुने

बुलडाणा : कोरोना विषाणुच्या साथीला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषीत केल्यानंतर प्रशासकीय विभागासह सेवाभावी संस्था देखील अलर्ट झाल्या असून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पूढाकार घेत आहेत. परंतू काही महाभाग अर्थात मेडीकलधारक मास्कचा काळाबाजार करीत असतांना, येथील निराधारांचे आधारवड ठरलेल्या दिव्या फाउंडेशनने आज १९ मार्चला विविध ठिकाणी मास्कचे निशुल्क वाटप करुन सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा कित्ता गिरवला आहे. तसेच खबरदारीचे आवाहन करुन कोरोनाचा जागर केला.

निराधार,मनोरुग्णांच्या सेवेत तत्पर असणाऱ्या व गोरगरिबांविषयीची कणव असलेल्या दिव्या फाऊंडेशनने कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सजग पवित्रा घेऊन आवश्यक त्या लोकांना मास्कचे वाटप केले.

कोरोना या विषाणूची धास्ती सर्वत्रच आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यात एकही कोरोनाचा सकारात्मक रुग्ण आढळला नाही. मात्र याबाबत खबरदारी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.याचपृष्ठभूमीवर दिव्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांनी आज १९ मार्चला येथील बसस्थानकावर एसटी चालक, वाहक , प्रवाशी, पोलीस स्टेशन येथील अधिकारी, कर्मचारी तसेच संगम चौक आणि कारंजा चौकात नागरिकांना मास्कचे मोफत वाटप करुन कोरोना बाबत जनजागृती केली. यावेळी प्रामूख्याने राजेंद्र टिकार सोमु कायस्थ,सुनील तिजारे, गजानन अवसरमोल,राजेंद्र मोरे भूषण वाठोरे,निलेश शिंदे,अजय जाधव,निलेश राऊत पत्रकार, संदीप वानखेडे पत्रकार, वैष्णवी पवार, शालिनी डुकरे,डॉ नंदिनी रिंढे,रंजना कायस्थ,मीन जगताप, विद्या वानखेडे,ज्योती गवई, कोमल ठाकरे,संदीप चंदन,अशोक काकडे दिव्या फाउंडेशनचे पदाधिकारी यांची उपस्थिती होते.

देशात कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या आप्तांना प्रत्येकी ४ लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केंद्राने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विट करून, ‘कोरोनाशी एकजुटीने लढूया’असे देशवासीयांसह सार्क राष्ट्रांनाही आवाहन केले. असे असले तरी, काही मेडीकल धारक प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून मास्कचा काळा बाजार चालवित आहेत. या पृष्ठभूमीवर ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईत रस्त्यावर उतरून मेडीकल दुकानांची पाहणी करीत दोषींविरुद्ध गून्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे दिव्या फाउंडेशन सारख्या सेवाभावी संस्था मोफत मास्क वाटप करून गो- कोरोनाचा संदेश देत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button