Maharashtra

सुस्ते येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर

सुस्ते येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते या गावामध्ये सोमवारी आयोजित केल होत या रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला १११ रक्त दात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास संयोजकाच्या वतिने २० लिटरचा जार भेट देण्यात आला रक्तदान हेच श्रेष्ठ दान
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.
तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.यावेळी कुमार खवळे, धनंजय वाघमारे, ज्ञानेश्वर पाटोळे, किरण लोखंडे सोमनाथ वाघमारे, किरण फडतरे ,मल्हारी खवळे, रवी खवळे, अमोल वाघमारे, पांडुरंग वाघमारे ,विकी बंगाळे, किशोर कसबे, राहुल वाघमारे ,अजय गायकवाड ,तुषार चव्हाण, महेश रोकडे ,अशापाक तांबोळी, श्रीकांत खवळे, सागर रणदिवे ,साजन वाघमारे ,बिभीषण लोखंडे, व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान सुस्ते व कट्टर बॉईज सुस्ते ,BRAND 111 सुस्ते येथिल ग्रुप ने सहकार्य केले व युवकांचे मार्गदर्शक श्री.एस.के.चव्हाण सर युवा नेते अजिंक्य वाघमारे यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button