Kolhapur

अनंतशांती, सप्तरंग व सोशल सर्कल या सामाजिक संस्थामार्फत दारवाड येथे औषधे व मास्क वाटप कार्यक्रम

अनंतशांती, सप्तरंग व सोशल सर्कल या सामाजिक संस्थामार्फत दारवाड येथे औषधे व मास्क वाटप कार्यक्रम

कोल्हापूर : अनंतशांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सप्तरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था , सोशल मल्टीपरपज सोसायटी कोल्हापूर यांचे वतीने भुदरगड तालुक्यातील दारवाड येथे आल्सेनिक आल्बम व मास्क वाटप कार्यक्रम करण्यात आला . समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्दात भावनेने ही मदत देत असल्याचे अध्यक्ष भगवान गुरव, उद्योजक दत्ता पाटील, सुमित्रा भोसले, रोहीणी भोसले, सुभाष भोसले यांनी औषधे वितरण व मास्क वाटप प्रसंगी सांगितले.
सध्याची कोवीड परिस्थिती पाहता ग्रामिण भागात कोवीड एक समस्या ठाण मांडून बसली आहे. ही समस्या निवारण व्हावे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
औषधे व मास्क वाटप सरपंच सुरेश कुंभार , उपसरपंच गिताजंली पाटील, बाळासो शेणवी,वंसत मिटके यांच्या उपस्थितीत कोविडचे नियम पाळून ग्रामस्थाना वितरीत करणेत आले यावेळी उपसंरपच गितांजली पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले व या तिन्ही संस्थाना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शंकर गुरव, बाळासो रेडेकर, विठ्ठल सुतार ,संजय मिटके , बाळासो शेणवी, रमेश भारमल , गावकरी व इतर ग्रामपंचायत पदाधिकारी हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button