Faijpur

स्व.विपुल बोरोले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्याना खाऊ वाटप

स्व.विपुल बोरोले यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्याना खाऊ वाटप

फैजपूर : प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

येथील बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळ, फैजपूरचे सहसचिव प्रा. डॉ. विलास चुडामण बोरोले यांचे सुपुत्र स्व. विपुल बोरोले यांच्या जयंती प्रित्यर्थ येथील विपुल विलास बोरोले प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेतील बालवाडी व इयत्ता १ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांना हा अल्पोपहार देण्यात आला होता. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. जे. तळेले सर, पर्यवेक्षक बी. एम. बोंडे सर, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button