Lonand

शासकीय योजनांचा लाभ घेऊन कुटुंबाचा उद्धार करावा डॉक्टर गोरखनाथ माने यांचे प्रतिपादन

शासकीय योजनांचा लाभ घेऊन कुटुंबाचा उद्धार करावा डॉक्टर गोरखनाथ माने यांचे प्रतिपादन

दिलीप वाघमारे

आजच्या काळामध्ये महिलांनी शासकीय योजनांचा पाठपुरावा करून संसाराला काहीना काही हातभार लावला तरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल याकरता स्वतःच्या पायावर ती उभी राहून कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉक्टर गोरखनाथ माने पंचायत समितीचे उपसभापती यांनी महिलांना शिवणकाम प्रशिक्षण कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करते वेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी अनिल चव्हाण ग्रामपंचायत सदस्य म्हणाले कि शासनाच्या योजना लाभ प्रत्येक कुटुंबातील महिलांनी घेऊन शिवणकाम भरत काम घरगुती स्वयंरोजगार सुरू करण्याची गरज आहे यासाठी प्रत्येक कुटुंबातील महिलांनी व्यवसाय करावा असे मत व्यक्त केले. ग्रामपंचायत कडून प्रशिक्षणाचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले.

यावेळी विजय शिंदे उपसरपंच डॉक्टर गोरखनाथ माने उपसभापती पंचायत समिती प्रकाश जगदाळे वर्षाचे सदस्य ग्रामपंचायत पूनम गौतम आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अँड हेमलता जगदाळे यांनी केले आभार प्रकाश जगदाळे यांनी केले या कार्यक्रमास पुरंदर तालुक्यातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button