Maharashtra

खेळ कोणाला इथे प्रशासनाचा कळला..?

खेळ कोणाला इथे प्रशासनाचा कळला..?


अमळनेर : अमळनेर बोरी पात्रात दिवसा तसेच रात्री रेती चोरी हा नेहमीचा विषय बनला आहे. वारंवार रेती चोरी करणाऱ्या न वर होणारी कार्यवाही होत असून सुधा उंदराचा जीव जातो व मांजरीचा खेळ होतो. अशा प्रकारे रेती माफिया प्रशासनाशी मिळून प्रशासनाचा च महसूल बुडवत आहे. त्यामुळे एकूणच रेती चोरट्यांना प्रशासनाचा कुठलाही वचक राहिला नाही. तसेच दिवसा व रात्री रेती भरून रस्त्यावर वेगाने वाहन चालवतात तर काही महाभाग तर दारू पिऊन रेती वाहन चालवतात आणि ह्या साऱ्या गोष्टींचा सर्व सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. वारंवार नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. मोठे मोठे वाळू माफिया मस्त सुरक्षित आहेत. अशा पद्धतीने हे सत्र सुरूच असतं नागरिकांच्या मनात प्रशासनाच्या कार्यवाही विरोधात संभ्रम आहे. कदाचित रेती चोरी विषय प्रशासन आणि रेती माफिया मिळते जुळते तर नाहीत असा प्रश्न नागरिकांनकडून उपस्थीत केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button