Motha Waghoda

मोठा वाघोदा ग्रामपंचायतीवर शौचालय कामी महिलांची धडक सरपंच मात्र गायबच

मोठा वाघोदा ग्रामपंचायतीवर शौचालय कामी महिलांची धडक सरपंच मात्र गायबच

महिला शौचालयाची झालेली दुरावस्थासह गांव सोडून परगावी रहिवासी झालेल्या सरपंच बद्दल तीव्र संतापाची लाट

सरपंच पद वाघोद्याच रहिवास मात्र अकलूज ( भुसावळ) ला
मोठा वाघोदा येथील अधिवास लोकनियुक्त सरपंच यांनी सोडल्यामुळे कामे खोळंबली

प्रतिनिधी मुबारक तडवी

मोठा वाघोदा येथील निंभोरा रोडवरील वार्ड क्र.३ मधील महिला शौचालयाची २ वर्षापासून अतिशय दुरावस्था झाली असून छतावरील टिनपत्रे फुटली असल्याने महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक यांना वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतीकडून साधी डागडुजी सुध्दा केली नसल्यामुळे या भागातील महिलांना असह्य अडचणी निर्माण झाल्या व आज महिलांनी थेट ग्रामपंचायतीवर धडक देत गैरहजर, कामचुकार , बेजबाबदार लोकनियुक्त सरपंच यांच्या सह ग्रामविकास अधिकारी, पदाधिकारी निष्क्रिय कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली मात्र महाशय सरपंच च ग्रामपंचायतीत हजर राहत नसल्याने गावातील दैनंदिन कारभार थांबला आहे त्याबद्दल लोकनियुक्त सरपंच यांना काडीमात्र चिंता नसल्याचेही महिलांनी सांगत आपल्या समश्यांचे गार्हाणे उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी व ग्रामपंचायत सदस्य मुबारक उर्फ ( राजू)अली तडवी यांचेसमक्ष मांडलं संतप्त महिलांची समश्या जाणून घेतल्यानंतर उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी व सदस्य मुबारक तडवी लागलीच कर्मचारी पाठवून छतावरील फुटलेले टिनपत्रे बदलवून दुसरे टाकीत संतप्त महिलांना शांत करीत समाधान केले मात्र गैरहजर बेजबाबदार लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायतीला गैरहजर राहतील तर उपसरपंच सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कारभाराचा दैनंदिन गाडा कुठपर्यंत हाकायचा ?मग ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच असून उपयोग तरी काय?महाशय सरपंच सतत गैरहजर असल्याचे ऐन मोठा वाघोदा कोरोना संकटात असताना इंन्सिडेंट कमांडंट फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी खुद्द अनुभवले संपर्क ही केला होता मात्र महाशय सरपंच यांचेकडून काही एक प्रतिसाद मिळाला नव्हता यांसह अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कार्यवाहीस टाळाटाळ का? कारवाई स दिरंगाई मुळेच मोठा वाघोदा ग्रामपंचायती सह ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तरी संबंधितांनी तात्काळ दखल घेऊन गावकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी गावकर्यांतून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button