Maharashtra

कृषिकन्या जयश्री मोहरे यांच्याकडून माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक

कृषिकन्या जयश्री मोहरे यांच्याकडून माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक

दिलीप आंबवणे पुणे

पुणे : खेजवळील पिंपरी खुर्द येथील शेतकऱ्यांना रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्येने ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत माती परीक्षण प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकऱ्यांकडून होत असलेला रासायनिक खतांचा अतिवापर, तणनाशके व कीटकनाशकांचा वापर आणि बारमाही पिके यामुळे जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच जमिनीतील महत्त्वपूर्ण घटकांचे प्रमाण कमी होत आहे . शास्त्रीय पद्धतीने माती परीक्षण केल्याने जमिनीमधील अन्नघटकांचे प्रमाण व जमिनीच्या आरोग्याविषयी माहिती मिळणे शक्य होते. रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या कु.जयश्री मनोहर मोहरे यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाविषयी माहिती दिली .माती परीक्षणाचा मूळ उद्देश हा जमिनीत पीक वाढीसाठी तसेच आवश्यक घटकांची कमतरता भरून काढणे हा आहे. जमिनीत गरजेइतकेच खतांचे प्रमाण शेतकऱ्यांनी वापरावे. कंपोस्ट खते व सेंद्रिय खतांच्या वापरामुळे तसेच आलटून पालटून पिके घेतल्यास जमिनीचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते . असेही जयश्री मोहरे यांनी सांगितले . मातीचा नमुना कसा घ्यावा ? कसा घेऊ नये ? मातीची उत्पादकता सुधारण्यासाठी काय करावे ?आवश्यक अन्नघटक व त्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे याविषयी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .यावेळी शेतकरी शांताराम काळे ,अशोक काळे , विकास पाचारणे , विजय काळे सीमा काळे ,अशा काळे हे शेतकरी उपस्थित होते. अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ . डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर .जी .नलवडे, प्रा .एस .आर. आडत, प्रा . एस.एम. एकतपुरे यांचे मार्गदर्शन लाभले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button