बिलोलीत फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरु
नांदेड प्रतिनिधी (वैभव घाटे)
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बिलोली कृषी विभागाच्या वतीने आत्माच्या सहकार्यातुन बिलोली येथिल बळीराजा शेतकरी गटाचे सचिव प्रकाश जेटे व लोहगाव येथिल भाजीपाला शेतकरी गटाचे अध्यक्ष शंकर चौधरी या शेतकऱ्यांच्या पुढाकारातुन शेतकरी ते ग्राहक आसे थेट फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे कोरोनामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला व फळे विक्री करण्यास अडचण निर्माण झाली होती बिलोली कृषी विभागाच्या आत्मा यंञणे मार्फत शेतकरी गटाना भाजीपाला फळे विक्री बाबत प्रोत्साहन देण्यात आले तालुका कृषी अधिकारी विजय घुगे मंडळ कृषिधिकारी यमलवाड आत्माचे सतिष कांबळे यांनी मार्गदर्शन केले त्या नंतर बिलोली येथिल बळीराजा शेतकरी गटाचे सचिव लोहगाव येथिल फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी यांनी फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरु केले भाजीपाला विक्री केंद्रावर शासनाच्या सुचनेचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
फळे व भाजीपाला विक्री केंद्रमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत आहे कृषी विभागाच्या वतिन तालुक्यातील इतर शेतकरी गटाना मार्गदर्शन करण्यात आले आहे कासराळी व लोहगाव येथिल गटाचे टरबुज चिकु सर्वत्र विक्रीला उपलब्ध झाले आहेत .बिलोली व परिसरातील शेतकरी गट ग्राहकाना थेट भाजीपाला फळे विक्री करित आहेत बस स्थानक जुना बस्थानक नगरपालिका तसेच कुंडलवाडी सगरोळी लोहगाव या ठिकाणी भाजीपाला फळे विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे या शेतकरी गटामार्फत दररोज विविध भाजीपाला 50 ते 70 क्विंटल विक्री होत आहे थेट शेतकऱ्यांचा माला ग्राहकापर्यत येत आसल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.






