Yawal

किशोर तायडे यांचा घातपात चौकशी करण्याची निळे निशान समाजिक सघंटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांची मागणी

किशोर तायडे यांचा . घातपात चौकशी करण्याची. निळे निशान समाजिक.सघंटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांची मागणी

यावल ( प्रतिनीधी )
यावल तालुक्यातिल आमोदा गावात दि .११ ऑगस्ट २०२१ रोजी किशोर तायडे नावच्या इसमाची हृदय विकारांचा झटका आल्याचे भासवुन दि .१२ आगस्ट २०२१ रोजि किशोर तायडे यांचे प्रेत स्मशान भुमी मध्ये नेऊन परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु एक अज्ञात व्यक्तीने फैजपुर पोलिसाना फोन करून माहिती दिली तेव्हा फैजपुर पोलिस स्टेशनचे तात्कालीन पोलिस निरिक्षक वानखेडे हे पोलिसांचा ताफा घेऊन आमोदा गावांच्या स्मशान भुमी मध्ये दाखल झाले व रचलेल्या सरनावर ठेवलेले प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदन करिता ग्रामिण रुग्णालय यावल येथे पाठविण्यात आले नंतर शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट झाले कि मयत किशोर तायडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली
(१) गळफास घेऊन आत्महत्या केली असेल तर किशोर तायडे यांच्या पत्नीने पोलिस पाटिल किवा पोलिसांन का नाही कळविले ? (२) किशोर तायडे यांनी गळफास घेतला असेल तर त्याच्या प्रेताचे परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न का करण्यात आले ? (३) किशोर तायडे याने गळफास घेतला असेल तर हृदय विकाराचा झटका आल्याचा बनाव का करण्यात आला ? (४) गळफास घेतला नंतर सर्व प्रथम कोणी बघितले व जेव्हा गळफास घेतला तेव्हा किशोर तायडे ची पत्नी कुठे होती ? (५) गळफास घेतल्यावर किशोर तायडे यांचे प्रेत कोणी उतरविले हृदय विकाराचा झटका आल्याचे नाटक करून किशोर तायडे याला सावदा तालुका रावेर येथिल खाजगी रुग्णालयात कोण घेऊन गेले त्यांचे सर्वांचे दि .१० ऑगस्ट २०२१ ते १२ ऑगस्ट २०२१ चे मोबाईलचे CRD टॉवर रुट डमडाटा व इतर विशेष बाबिचे . विश्लेशन करण्यात यावे आणि किशोर तायडे यांनि आत्महत्या का केली याचे स्पष्ट कारण पोलिसांनी शोधावे तसेच घडलेल्या घटनेतील सत्यता येत्या आठ दिवसात समोर आणावे अन्यथा निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची फैजपुर पोलिसांनी नोंद घ्यावी असे निवेदन संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी दिले तसेच न्याय न मिळाल्यास होणाऱ्या परिणामास पोलिस प्रशासन जबाबदार राहिल .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button